अन आईसमोर 130 फूट उंचावर आकाशात लटकत होता 5 वर्षांचा चिमुकला

केवळ दैव बलवत्तर असल्याने मोठा अनर्थ टळला

आकाशपाळणा अपघात photo credits youtube

आई तिच्या मुलांसाठी नेहमीच प्रोटे क्टिव्ह असते. मात्र मुलांच्या हट्टासमोर अनेकदा त्या झुकतं माप घेतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. मुलाच्या इच्छे समोर झुकलेल्या आई सोबत एक विचित्र प्रकार बीजिंगमध्ये घडला आहे. मुलाला आकाश पाळण्यात बसायचे होते. मात्र एंट्री फी अधिक असल्याने केवळ मुलालाच पाळण्यात बसवून आई खाली उभी राहिली. मात्र पाळणा सुरु झाल्यनानंतर घडलेला प्रकार त्या आई सोबतच उपस्थितांच्याही ह्रदयाचा ठोका चुकवणारा ठरला.

नेमकं काय घडलं ?

बीजिंगमध्ये ताइझोउ शहरामधील एक अम्युजमेंट पार्क आहे. या पार्क मधील आकाश पाळण्यात बसण्याचा ५ वर्षाच्या मुलाने हट्ट केला. यानंतर समजूत काढूनही मुलगा ऐकत नसल्याने त्याच्या आई ने केवळ मुलालाच पाळण्यात बसवण्याचे ठरवले. या पाळण्याचे तिकीट ३० युआन म्हणजेच ३०० रुपयांपेक्षा अधिक होते. त्यामुळे केवळ मुलाला पाळण्यात बसवण्याचं तिने ठरवलं . काही वेळातच पाळणा सुरु झाला. पाळणा आकाशात वर गेल्यानंतर घाबरलेल्या मुलाने खिडकीत बाहेर बघितले तेव्हा उत्साहाच्या भरात बाहेर वाकलेल्या मुलाची मान अडकली होती. सुमारे १३० फीट वर आकाशात मुलगा आकाश पाळण्यात लटकत होता.

उपस्थितांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर ताबडतोब पाळणा खाली करण्यात आला. त्यानंतर मुलाला बाहेर काढण्यात आला. मुलाला किरकोळ जखम झाली होती. दैव बलवत्तर असल्याने हा मुलगा बचावला. परंतू या प्रकारानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif