मुंबई, ठाणे शहरात रविवार सकाळी धुकचं धुकं! महाराष्ट्रात थंडीच आगमन की प्रदुषण? नेटकर्‍यांचा ट्विटर वर प्रश्न

ढगाळ वातावरणामुळे काही दिवस पाऊस अनुभवल्यानंतर आता थंडीचा गारवा मुंबईकर सध्या अनुभवत आहेत.

Mumbai Foggy Morning (Photo Credits: @Abs_Khandelwal/ Twitter)

ऐन नोव्हेंबर महिन्यात मागील काही दिवसात पाऊस अनुभवल्यानंतर आज मुंबई, ठाणेकरांची सकाळ धुक्यात झाली. आज (10 नोव्हेंबर) च्या सकाळी मुंबई, नवी मुंबई सह ठाणे शहरामध्ये आज सकाळी धुसर वातावरण होते त्यामुळे हे प्रदूषण आहे की थंडीमुळे धुकं आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. ट्विटरवरही अनेकांनी त्याप्रकारचे ट्वीट केले आहे. काही दिवसांपासून दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे 'स्मॉग़' मुळे वातावरण बिकट झाले होते. तशीच स्थिती मुंबईत निर्माण होतेय का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. नेहमीपेक्षा आज सकाळी वातावरणात थंडावा जाणवत असल्याने महाराष्ट्रात थंडीचं आगमन झाल्याची चर्चा आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात क्यार, महा चक्रीवादळाचा धोका असल्याने वादळी पावसाचे वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे काही दिवस पाऊस अनुभवल्यानंतर आता थंडीचा गारवा मुंबईकर सध्या अनुभवत आहेत.

ट्विटरवर मुंबईकरांचे प्रश्न

मुंबईतील आजची सकाळ 

 

रविवार सकाळची दृश्य  

 

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात वादळाचा धोका कमी झाल्यानंतर थंडीचं आगमन होण्याची शक्यता आहे. यंदा थंडीमुळे वातावरण 3-4 डिग्री कमी होण्याची शक्यता आहे.