दोन वाघांच्या झुंजीचे थरारक दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही, Watch Video
या व्हिडिओत वाघाची डरकाळी ऐकताच तुमच्या अंगाचा थरकाप उडून जाईल.
भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाचीच (Tiger) जर अन्य एका वाघासोबत प्रत्यक्षात झुंज पाहायला मिळाली तर? कल्पनेनेच अंगावर काटा उभा राहिल. मात्र ही कल्पना सत्यात उतरली आहे ती कान्हा राष्ट्रीय उद्यानातील या व्हिडिओने. या व्हिडिओमध्ये दोन वाघांच्या झुंजीचा थरार कॅमे-यात कैद करण्यात आला आहे. इतकच नव्हे तर या व्हिडिओमध्ये वाघाची डरकाळी सुद्धा स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. असं दुर्मिळ दृश्य पाहायला मिळणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
हे दृश्य आहे कान्हा राष्ट्रीय उद्यानातील. या उद्यानाची सफारी करायला गेलेल्या एका पर्यटकाने हा व्हिडिओ आपल्या कॅमे-यात कैद केला आहे असे या व्हिडिओतून दिसत आहे. या व्हिडिओत वाघाची डरकाळी ऐकताच तुमच्या अंगाचा थरकाप उडून जाईल.
पाहा व्हिडिओ:
हेदेखील वाचा- International Tiger Day 2019: का साजरा करतात वाघ दिन? जगापुढे भारताचा आदर्श; घ्या जाणून
हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर वाघांची तस्करी होत असल्या कारणाने हा राष्ट्रीय प्राणी काही दिवसांनी नामशेष होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकारनेही मग जागे होत वाघ वाचवा ही मोहीम हाती घेतली.
या मोहिमेमुळे आतापर्यंत 50 ठिकाणी व्याघ्रसंवर्धन प्रकल्प सुरु झाले आहेत. दरम्यान, वाघ वाचविण्यासाठी जगाच्या तुलनेत भारताने प्रचंड कष्ट घेतले आहेत. त्यामुळे व्याघ्रसंवर्धन मोहिमेत भारत हा जगात आदर्श ठरला आहे.