TikTok Ban: देशासाठी काहीही! मराठी टिकटॉकर ज्योती सावंत-नाईकरे यांचा परदेशात राहूनही टिकटॉक बॅन ला पाठिंबा (Watch Video)
शिवाय नाराज टिकटॉकर्स ना सल्ला देत त्यांनी आपल्या टॅलेंंटला महत्व द्या असे सांगितले आहे.
टिकटॉक बॅन (TikTok Ban In India) नंतर भारतात असे अनेक नाराज टिकटॉकर्स आहेत ज्यांनी आपण एकमेव प्लॅटफॉर्म गमावल्याचं दुःख व्यक्त केलं. मात्र भारतात न राहताही सरकारच्या टिकटॉक बॅन निर्णयाला पाठिंबा देत प्रसिद्ध टिकटॉकर ज्योती सावंत- नाईकरे (Jyoti Sawant-Naikare) या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत. टिकटॉक बॅन नंतर लेटेस्टलीने ज्योती यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी ज्योती यांनी आपला आवडता ऍप बॅन झाल्याचं दुःख तर व्यक्त केलंच पण सरकारचा निर्णय आणि देशावरचं प्रेम कधीही अधिकच असेल त्यामुळे अबू धाबी (abu Dhabi) मध्ये राहूनही आपण हा ऍप स्वतःहुनही डिलीट केल्याचं सांगितलं. हा एक प्लॅटफॉर्म होता असे अनेक प्लॅटफॉर्म निर्माण होतील तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्ही कोणत्याही प्लँटफॉर्मवर प्रसिध्द व्हाल त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं कारण नाही असा सल्ला सुद्धा ज्योती यांनी तरुण आणि हौशी टिकटॉकर्सना दिला आहे. TikTok App आता Hong Kong मधून घेणार एक्झिट, जाणून घ्या कारण
ज्योती सांगतात की, टिकटॉक आणि हॅलो ऍप मिळून माझे 1 मिलियन (10 लाख) फॉलोअर्स होते. जेव्हा हे दोन्ही ऍप बॅन झाले तेव्हा मला वाटलं की लोक आता मला विसरतील पण असं बिलकुल झालं नाही उलट मला माझ्या, '#खरंच' ला शोधत लोक माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोहचले त्यांनी मला युट्युब वर फॉलो करायला सुरुवात केले, ट्विटरवर सुद्धा चांगला प्रतिसाद मिळायला लागला. याचा अर्थ हाच की लोकांना टॅलेंट लक्षात राहत प्लॅटफॉर्म नाही त्यामुळे तुम्हीही कोणी प्रयत्न करत असाल तर कोणत्याही अन्य माध्यमातून तुमची कला दाखवायला जोपासायला सुरुवात करा.
ज्योती सावंत व्हिडीओ
दरम्यान, टिकटॉक बॅन झाल्यापासून अनेक मेड इन इंडिया ऍप ची चर्चा सुरु आहे. चिंगारी ऍप म्हणा किंवा MOj ऍप यातून अनेक जण आपले नवे व्हिडीओज बनवत आहेत, इंस्टाग्राम ने सुद्धा आता Reel हे नवे व्हिडीओ मेकिंग फीचर सुरु केले आहे.