Fact Check: जर्मनी मध्ये जन्मला तीन डोळ्यांचा मुलगा? जाणून घ्या 'या' व्हायरल व्हिडिओ क्लिप मागील सत्य
सोशल मीडियावर उपलब्ध असलेली माहिती अगदी पटकन व्हायरल होते. अशीच एक व्हिडिओ क्लिप सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे.
इंटरनेटवर विविध प्रकारच्या व्हिडिओज, फोटोज, क्लिप्सचा दिवसागणित मोठा भडिमार होत असतो. सोशल मीडियावर उपलब्ध असलेली माहिती अगदी पटकन व्हायरल होते. अशीच एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यात एका लहान मुलाला तीन डोळे असल्याचे दिसत आहे. 'Miracle Baby' असा दावा करणारी ही क्लिप सध्या व्हायरल होत आहे. हा मुलगा जर्मनीत जन्मला आला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान ही क्लिप जुनी असून हा एडिटेड व्हिडिओ आहे. यामागे कोणतेही तथ्य नाही.
व्हिडिओत दिसते की, हा मुलगा कारमध्ये बसला आहे आणि एक महिला त्याच्या गालावर लाडाने मारत आहे. त्यावेळी त्या मुलाच्या कपाळावर असलेला तिसरा डोळा डाव्या डोळ्याप्रमाणे फिरत आहे. हा व्हिडिओ युट्युब, फेसबुक, ट्विटवर व्हायरल होत आहे. त्यात तीन डोळ्यांचं बाळ असा दावा देखील केला जात आहे. तर काहीजण हे बाळ जर्मनीत जन्माला आले असल्याचे म्हणत आहे. तर अशी बाळं परदेशात जन्माला येतात असे काहीजणांचे म्हणणे आहे. परंतु, हा व्हिडिओ खरा नाही. ही डिजिटली एडिडेट व्हिडिओ क्लिप आहे. (कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये सारं काही बंद असल्याने वैतागलेल्या 4 वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव, Watch Video)
हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर देखील मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. तसंच या व्हिडिओला खूप व्ह्युज देखील मिळाले आहेत. जर तुम्ही युट्युबवर "three-eyed baby" असे सर्च केले तर तुम्हाला या व्हिडिओच्या अलिकडेच अपलोड केलल्या अनेक क्लिप्स मिळतील,. पण काळजीपूर्वक पाहिल्यास यातील एडिटिंग दिसून येईल. हा व्हिडिओ मुळचा कुठला आहे, कोणी अपलोड केला या संदर्भात माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, हा व्हिडिओ जुना असून ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता. त्याला 'The three-eyed man appeared' असे कॅप्शन देण्यात आले आहे.
तुमच्याकडेही हा व्हिडिओ आला असेल तर व्हि़डिओ सेंड करणाऱ्या व्यक्तीला हा व्हिडिओ फेक असल्याचे सांगा. त्यामुळे तीन डोळ्यांचा मुलगा, Miracle Baby असे काहीही अस्तित्वात नसून हा सर्व एडिटिंगचा खेळ आहे.