21 जूनला होणार जगाचा अंत? दक्षिण अमेरिका भागात वापरल्या जाणाऱ्या मायन कॅलेंडर मध्ये केलेल्या दाव्यावर वैज्ञानिकांचे स्पष्टीकरण वाचा
कोरोना महामारीमुळे आजवर जगातील बहुतांश देशात मृत्यूतांडव सुरु आहे. अशावेळी आता आणखीन एक धक्कादायक चर्चा सोशल मीडियावर सुरु होती, ती म्हणजे येत्या रविवारी 21 जून 2020 रोजी जगाचा अंत होणार आहे. काय आहे हा एकूण प्रकार याविषयी सविस्तर जाणून घेउयात..
Doomsday in This Month: 2020 वर्षाची सुरुवात झाल्यापासून जगभरावर मोठे संकट ओढवले आहे. कोरोना महामारीमुळे आजवर जगातील बहुतांश देशात मृत्यूतांडव सुरु आहे. अशावेळी आता आणखीन एक धक्कादायक चर्चा सोशल मीडियावर सुरु होती, ती म्हणजे येत्या रविवारी 21 जून 2020 रोजी जगाचा अंत होणार आहे. दक्षिण अमेरिकेतील देशात वापरल्या जाणाऱ्या मायान कॅलेंडर (Mayan Calender) च्या अनुसार हा दावा करण्यात आल्याचे सुद्धा सांगितले जात होते. जगाचा अंत होण्यामागे कोरोना हे कारण असेल असे या दाव्यानुसार चर्चेत होते. अर्थात या चर्चांनी सोशल मीडियावर तुफान अफवा पसरू लागल्या आहेत मात्र आता या चर्चांना पूर्णविराम देत वैज्ञानिकांनी स्पष्टीकरण दिले आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही या सर्व केवळ अफवा आहेत आणि 21 जून ला किंवा येत्या काळात कधीही जगाचा अंत होईल असे कोणतेही संकेत नाहीत असे वैज्ञानिकांनी म्हंटले आहे. काय आहे हा एकूण प्रकार याविषयी सविस्तर जाणून घेउयात..
द मिरर यूके च्या वृत्तानुसार, अलीकडे पाओलो तगलोगुइन या वैज्ञनिकाने ट्विटर वर एक व्हिडीओ शेअर करत विचित्र दावा केला होता. 1582 मध्ये सुरु झालेल्या ग्रेगोरियन कॅलेंडरच्या अनुसार एका वर्षातून 11 दिवस कमी झाले होते. 11 दिवस हे वर्षाच्या तुलनेत बरेच कमी वाटत असले तरी सलग 286 वर्ष हे 11 दिवस कमी कमी होत असल्याने साधारण 2012 मध्ये जगाचा अंत होईल असे मानले जात होते. ग्रेगोरियन कॅलेंडर मधील आणि मायन कॅलेंडर मधील फरकानुसार आता आत अजूनही 2012 सुरु आहे असे सांगितले जाते. त्यामुळे 21 डिसेंबर 2012 हे आताचे 21 जून 2020 असून यादिवशी जगाचा अंत होईल असे म्हंटले जात आहे. काहींच्या मते मायन हा डिस्लेक्सिक असल्याने त्याने 2012 आणि 2021 यामध्ये लिहिण्यात गल्लत झाली होती असेही मानले जाते.
पहा ट्विट
दरम्यान, नासाच्या वैज्ञानिकांनी हे सर्व दवे फोल असल्याचे सांगितले आहे. या सर्व भाकडकथा आहेत यावर पुस्तक लिहिले जाऊ शकते, चित्रपट किंवा नाटक बसू शकते मात्र यामागे विज्ञान किंवा पुरावा नसल्याने यात तथ्य नाही. एकीकडे जगात महामारी, आग, अतिवृष्टी, टोळधाड आणि अन्य अनेक धक्कादायक प्रकार घडत असताना या अफवेने लोकांमध्ये भीती निर्माण होणे साहजिक आहे मात्र यात सत्य किती हे तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे.