Apple Smartwatch:   घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण

या घड्याळात फीचर सोफिसटिकेटिड ऑपरेटिग सिस्टम (एसओएस) कार्यरत असते. हा कॉल आल्यावर काही वेळातच शिकागो पोलीस फायटर बोट घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचले.

Apple Smartwatch | (Photo Credits: apple.com)

हातात घड्याळ वापरल्यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. हे वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. पण, खरोखरच असे खडले आहे. शिकागो (Chicago) येथील एका व्यक्तीसोबत घडली आहे. न्यूज पोर्टल 9 टू 5 ने केलेल्या दाव्यानुसार हा व्यक्ती पाण्यात बूडत होता. मात्र, त्याने अॅपल कंपनीचे घड्याळ (Apple Smartwatch) हातात परिधान केले होते. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. या व्यक्तीचे नाव एशो असे असल्याचे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

सविस्तर वृत्त असे की, शिकागो येथील क्षितीजाचे (स्कायलाईन) फोटो काढण्यासाठी हा व्यक्ती 31 स्ट्रीट हार्बरने मैककॉर्मिक प्लेस पर्यंत डेट स्कीचा प्रवास करत होता. दरम्यान, एक उंच लाट स्कीला धडकली. ज्यामुळे तो व्यक्ती पाण्यात पडला. या घटनेत त्या व्यक्तीने आपला मोबाईलही गमावला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांकडे त्याला मदतही मागता येत नव्हती. तसेच, त्याचा आवाजही इतरांपर्यंत पोहोच नव्हता. पाण्यात येणाऱ्या लाटांसोबत तो हेलखावे खात कधी पाण्यावर तर कधी पाण्याखाली पोहोचत होता.

दरम्यान, या व्यक्तीने हातात असलेल्या Apple Smartwatch च्या माध्यमातून आपत्कालीनस सेवेशी संपर्क साधला. या घड्याळात फीचर सोफिसटिकेटिड ऑपरेटिग सिस्टम (एसओएस) कार्यरत असते. हा कॉल आल्यावर काही वेळातच शिकागो पोलीस फायटर बोट घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्यासोबत एक हेलिकॉप्टरही होते. अखेर या एशो नामक या व्यक्तीला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. (हेही वाचा, घड्याळ शौकीनांसाठी खुशखबर! Garmin Instinct स्मार्ट वॉच भारतात लॉन्च; किंमत, फिचर्स घ्या जाणून)

Apple Smartwatch मध्ये असलेल्या फीचर सोफिसटिकेटिड ऑपरेटिग सिस्टम (एसओएस) वापरत जर एखादा युजर एसओएस कॉल करतो तर, त्याचा कॉल स्वयंचलीतपणे थेट स्थानिक आपत्कालीन नंबरवर जातो. ज्यामुळे आपत्ती निवारण विभाग आणि पोलिसांना घटनास्थळी जाऊन अडचणीत असलेल्यांचे प्राण वाचवता येतात.