शिक्षक आणि विद्यार्थिनीचा अश्लील TikTok व्हिडीओ झाला व्हायरल; दोघांना करावं लागलं लग्न

टिकटॉकच्या व्हायरल व्हिडीओमुळे अलीकडे पाकिस्तान (Pakistan) मधील एका शिक्षक आणि विद्यार्थीनेचे चांगलेच बारा वाजले आहेत.

Image For Representations (Photo Credits: Wikimedia Commons)

TikTok Video: टिकटॉकच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे आजवर अनेकजण फेमस झाले आहेत म्ह्णूनच आपले व्हिडीओ व्हायरल व्हावे यासाठी हे टिकटॉकर्स शक्य त्या सर्व थरांना जात असतात. मात्र अशाच एका व्हायरल व्हिडीओमुळे अलीकडे पाकिस्तान (Pakistan) मधील एका शिक्षक आणि विद्यार्थीनेचे चांगलेच बारा वाजले आहेत. हरिपूर (Haripur) मधील एका कॉलेज मधील शिक्षक आणि विद्यार्थिनीचा एका क्लोज व्हिडीओ टिकटॉकवर  व्हायरल झाला होता, मात्र हा व्हिडीओ सामाजिक सीमांचे उल्लंघन करणारा आहे असे म्हणत अनेकांनी यावर टीका केल्या. परिणामी शिक्षकाला आपल्या नोकरीवरून देखील काढून टाकण्यात आले, इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी सुद्धा या शिक्षकाला टोमणे मारून हैराण करायला सुरुवात केली, या सगळ्याला कंटाळुन अखेरीस शिक्षकाने विद्यार्थिनी सोबत एका आठवड्यात कोर्टात जाऊन कायदेशीर पद्धतीने विवाह केल्याचे समजत आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की हा शिक्षक अगोदरच तीन मुलांचा वडील आहे.

द एक्सप्रेस ट्रीब्यून च्या वृत्तानुसार, रफकत हुसैन असे या शिक्षकाचे नाव असून त्याचे वय 38 वर्ष इतके आहे तर विद्यार्थिनी जैनब अली ही अवघ्या 24 वर्षांची आहे. रफकत आणि जैनब यांचा व्हिडीओ व्हायरल होताच दोघांनाही कॉलेज मधून काढून टाकण्यात आले, जैनब ला मायग्रेशन सर्टिकफिकेट न देता काढल्याने तिला कोणत्या कॉलेज मध्ये ऍडमिशन  मिळणे देखील शक्य नव्हते. यावर प्रतिक्रिया देताना " मी सुज्ञ असून मला माझा जोडीदार निडवण्याची पूर्ण परवानगी आहे मात्र तरीही लोक माझ्यावर आरोप करत आहेत. यामुळे मी आणि माझे कुटुंब मानसिक त्रास सहन करत आहोत तसेच कॉलेजने हा वाद वाढवल्याने माझ्या शिक्षणावर सुद्धा परिणाम होत आहे असे जैनब हिने सांगितले आहे. याशिवाय, हा व्हिडीओ आपण कॉलेजच्या आवारात काढलेला नाही असेही ती म्हणाली.

दुसरीकडे रफकत याने तर हा व्हिडीओ कोणीतरी चुकीच्या पद्धतीने शूट केल्याचा देखील दावा केला आहे. मूळ व्हिडीओ हा या स्वरूपात नसून कोणीतरी लपून हा व्हिडीओ काढलेला आहे, तसेच आम्ही व्हिडीओ कुठेही पोस्ट केला नव्हता कुणीतरी कुप्रवृत्तीच्या इसमाने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे असेही रफकत यांनी म्हंटले आहे.मात्र आता स्थानिकांच्या दबावाला बळी पडून अखेरीस या दोघांनी स्थानिक कोर्टात लग्न केले आहे, तसेच लग्नानंतर रफकत यांनी आपल्या लग्नाचे सर्टिफिकेट शेअर करून आम्ही दोघे अगोदरपासूनच रिलेशनशीप मध्ये होतो आणि आमच्या घरच्यांच्या परवानगीची वाट पाहता होतो असे म्हंटले आहे.