Get Well Soon DADA म्हणत सुदर्शन पटनायक यांनी वाळूशिल्प साकारून सौरव गांगुली ला दिल्या शुभेच्छा!

या वृत्तानंतर प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी देखील सुरेख सँडआर्टद्वारे गेट वेल सून दादा म्हणत सौरव गांगुलीची प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Sudarsan Pattnaik's sand art (Photo Credits: @sudarsansand/Twitter)

बीसीसीआय अध्यक्ष (BCCI President) सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला काल (2 जानेवारी) हृदयविकाराचा झटका आल्याने कोलकाता येथील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या वृत्तानंतर सर्वच स्तरातून सौरव वर  प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  दरम्यान, प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनी देखील सुरेख सँडआर्टद्वारे (Sand Art) गेट वेल सून दादा (Get Well Soon Dada) म्हणत सौरव गांगुलीची प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या सुरेख सँडआर्टमध्ये पटनायक यांनी वाळूने 22 फूट लांबची क्रिकेट बॅट तयार केली आहे. त्यात बीबीसायचा लोगो असलेला कोट घातलेला सौरव गांगुली साकारला आहे आणि बाजूला गेट वेल सून दादा असा संदेश लिहिला आहे. सुदर्शन पटनायक यांनी हा फोटो ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे. (BCCI President Sourav Ganguly यांना Mild Cardiac Arrest चा झटका कोलकत्ता च्या Woodland Hospital मध्ये दाखल)

Sudarsan Pattnaik Tweet:

दरम्यान, सौरव गांगुली आपल्या घरातील जीममध्ये वर्कआऊट करत असताना त्याला हार्ट अॅटक आला. त्यानंतर तातडीने त्याला कोलकाता येथील Woodlands hospital मध्ये दाखल करण्यात आले. गांगुलीवर अॅँटीओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

"सौरव गांगुलीचे अँजिओप्लास्टी झाली असून तो स्थिर आहे. 24 तास त्याला वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येईल. त्याच्या हृदयातील दोन ब्लॉकेजेस दूर करण्यात आले. सोमवारी यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल. तसंच तो सेटल होणं हे प्राधान्य असेल.सध्या तो बोलतही आहे," अशी माहिती डॉ. आफताब खान यांनी प्रसारमाध्यमांना दिली.