Srisailam Laddoo Controversy: श्रीशैलम मंदिरातील लाडू प्रसादात मृत झुरळ; भक्ताकडून आरोप, Video Viral

Dead Cockroach in Prasadam: श्रीशैलम मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसादममध्ये एका भक्ताला मृत झुरळ आढळून आल्याने स्वच्छतेबाबत चिंता निर्माण झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाला असताना, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी हा दावा नाकारला आणि अन्न सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.

Dead Cockroach in Prasadam | (Photo Credit- X)

Laddoo Prasadam Controversy: मंदिराच्या लोकप्रिय लाडू प्रसादममध्ये मृत झुरळ आढळल्याचा दावा (Devotee Complaint) एका भक्ताने केल्यानंतर श्रीशैलम मंदिरातून (Srisailam Temple) एक धक्कादायक आरोप समोर आला आहे. भक्ताने केलेल्या आरोपानुसार 29 जून रोजी घडलेल्या या घटनेमुळे मंदिरातील स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी हा दावा नाकारला आणि अन्न सुरक्षेचे (Temple Food Safety) आश्वासन दिले आहे. आरोप करणाऱ्या भक्ताची ओळख सरसचंद्र के अशी झाली आहे. या भक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये झुरळ असल्याचे दाखवले, जो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट आणि वाद निर्माण झाला आहे.

खुलाशाऐवजी लाडू हिसकावण्याचा प्रयत्न

दिशा डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, सरसचंद्र यांनी लाडू खरेदी करून तो खाण्याच्या तयारीत असताना त्यामध्ये झुरळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मंदिर कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी खुलासा करण्याऐवजी लाडू त्यांच्या हातातून हिसकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. या प्रकारामुळे उपस्थित इतर भक्तही हैराण झाले आणि त्यांनीही प्रसादाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले. या वादाला आणखी चालना मिळाली, जेव्हा काही उपस्थितांनी सरसचंद्र यांना मोबाईलमधून व्हिडीओ डिलिट करण्यास भाग पाडल्याचे सांगण्यात आले. (हेही वाचा, Bone Pieces Found In Prasadam: आंध्रच्या श्रीशैलम मंदिराच्या प्रसादात सापडले हाडांचे तुकडे; भक्ताची मंदिर व्यवस्थापनाकडे तक्रार)

भक्ताकडून जोरदार दावा

दरम्यान, या घटनेनंतर सरसचंद्र यांनी मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी तक्रार सादर केली. NDTV च्या वृत्तानुसार, त्यांनी लिहिले, 29 जून रोजी मी श्रीशैलम देवस्थानाला भेट दिली आणि लाडू प्रसादामध्ये एक झुरळ आढळले. प्रसाद तयार करताना कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा केला जात आहे. कृपया लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी. (हेही वाचा, Centipede in Tirupati Prasad: तिरुमला मंदिरातील अन्नप्रसादात किडे सापडल्याचा भक्ताचा आरोप, TTD आरोप फेटाळला)

प्रसादातील मेलेले झुरळ (Video)

या वादावर प्रतिक्रिया देताना कार्यकारी अधिकारी श्रीनिवास राव यांनी सर्व आरोप फेटाळले असून, प्रसादाची स्वच्छता नीट राखली जाते असा दावा केला आहे. NDTV शी बोलताना त्यांनी सांगितले, लाडू हे आमच्या कर्मचाऱ्यांच्या सतत देखरेखीखाली तयार केले जातात. त्यामध्ये झुरळ सापडण्याची शक्यता नाही. ते पुढे म्हणाले की, भक्तांनी प्रसादाच्या गुणवत्तेबाबत काळजी करू नये, कारण स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन केले जाते. या घटनेमुळे श्रद्धेने घेतल्या जाणाऱ्या श्रीशैलमच्या लाडू प्रसादाच्या पवित्रतेवर शंका निर्माण झाली असून, अनेक भक्त यामुळे अस्वस्थ आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement