नाशिक पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकात 11 वर्षांच्या सेवेनंतर निरोपाच्या क्षणी Sniffer Dog भावूक; पहा Video

मात्र त्यावेळी कुत्रा अत्यंत भावूक झाला होता. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

Spike, a sniffer dog of Nashik Police (Photo Credits: ANI)

कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक प्राणी असून तो पोलिसांचा मित्र असतो. अशी वाक्य आपण लहानपणी ऐकली आहेत. कालांतराने पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकात (Bomb Detection and Disposal Squad) महत्त्वाचे कार्य करणारे कुत्रे (Sniffer Dog) आपण पाहिले आणि त्या वाक्याची प्रचिती आपल्याला आली. असाच एक कुत्रा नाशिक पोलिस दलातून (Nashik Police Force) तब्बल 11 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाला. त्याला पोलिसांकडून अगदी छान पद्धतीने निरोप देण्यात आला. याचा व्हिडिओ एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.

नाशिक शहर पोलिस दलाच्या बॉम्ब शोध आणि विल्हेवाट पथकात एक स्निफर कुत्रा तब्बल 11 वर्षे काम करत होता. अखेर 24 फेब्रुवारी रोजी त्याला निरोप देण्यात आला. त्यावेळी त्याला पोलिसांच्या गाडीच्या बोनेटवर  बसवले होते. गाडी फुग्यांनी आणि गुलाबाच्या फुलांनी सजवण्यात आली होती. तर गाडीच्या दोन्ही बाजूला पोलिस कर्मचारी टाळ्यांच्या गजरात त्याला निरोप देत होते. विशेष म्हणजे हा  स्निफर कुत्रा निरोपाच्या वेळी अत्यंत भावूक झाला होता. अगदी शांतपणे बोनेटवर बसलेला हा कुत्रा अत्यंत निराश दिसत आहे.

पहा व्हिडिओ:

('या' शहरात कुत्रा झाला महापौर; दिमाखदार पद्धतीत पार पडला शपथविधी सोहळा, Watch Video)

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला नागपूर पोलिस विभागातील पोलिसांनीही स्निफर कुत्र्याला असाच छान पद्धतीने निरोप दिला होता. या कुत्र्याचे नाव राजा असून नागपूर पोलिस दलात त्याने तब्बल 10 वर्ष सेवा दिली होती.