PUBG Ban Effect: पबजी बॅन झाल्याने निरागस मुलाने असा व्यक्त केला राग; पहा Funny Video

याच्या या निरागस रागाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

PUGB Ban Effect (Photo Credits: Twitter)

गेल्या 2-3 महिन्यांपासून भारत-चीन सीमारेषेवरील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारताने चीनी अॅप्सवर बंदी घातली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा एका चीनी सैन्यांकडून पॅंगाँग सरोवर परिसरातही नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता भारताने चीन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 2 सप्टेंबर रोजी भारताने पबजी गेम सह 118 चायनीज अॅप्सवर बंदी घातली. त्यानंतर मात्र पबजी प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

दरम्यान पबजी बॅन होण्यामागील गंभीर कारणाची कल्पना नसलेला एक छोटा पबजी प्रेमी रागाने आपल्या भावना मांडत आहे. याच्या या निरागस रागाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा छोटा पबजी फॅन म्हणतोय, "हिचा इंस्टा बॅन करा ना. काय केलं होतं माझ्या पबजीने? आधीच किती कष्टाने क्राऊन 5 लेव्हला पोहचलो होता. गाड्यांच्या नव्या स्किन मिळाल्या होत्या. किती प्रो होतो मी आणि काय केलं हे. खूप राग येतोय. काय करु मी?" या व्हिडिओमधील या लहानग्या पबजी प्रेमीचा निरागस राग पाहुन तुम्हालाही हसू आवरणार नाही. (सरकारकडून पबजी गेमवर बंदी घातल्याने Twitterati वर पालकांनी व्यक्त केला आनंद तर युजर्सच्या चेहऱ्यावरील नाराजी दाखवणारे मजेशीर मेम्स व्हायरल)

पहा व्हायरल व्हिडिओ:

पबजी गेमचे वेड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना होते. मोठे, समजूतदार मंडळी गेम बंदीमागील कारणं जाणून आहेत. तसंच ते आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत नाहीत. मात्र छोटे पजबी प्रेमी अगदी दिलखुलास आपल्या भावना व्यक्त करत आहेत. दरम्यान पबजी बॅनवर भन्नाट मीम्सही सोशल मीडियात जबरदस्त व्हायरल होत आहेत.