Shimla Fruit Market Video: फळ विक्रेत्यांमध्ये जोरदार हाणामारी, शिमला फ्रूट मार्केटमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
असाच व्हिडिओ आता शिमला येथील फळ विक्रेत्यांचाही व्हायरल (Shimla Fruit Market Violent Video) झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी 'Baghpat Battle 2.0' असे नाव दिले आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील बागपत येथील फळविक्रेत्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ (Baghpat Battle Video) सोशल मीडियावर 2021 मध्ये व्हायरल झाला होता. असाच व्हिडिओ आता शिमला येथील फळ विक्रेत्यांचाही व्हायरल (Shimla Fruit Market Violent Video) झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी 'Baghpat Battle 2.0' असे नाव दिले आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, काही वादातून विक्रेते भाजीच्या रिकाम्या ट्रे आणि लाठीने एकमेकांवर हल्ला करत आहेत. पोलिसांनी बाजारपेठेत येऊन मध्यस्थी केल्यानंतरच हाणामारी संपली. पण व्हिडिओ (Viral Video) मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला. फळांवर बोली लावणाऱ्या दोन विक्रेत्यांमध्ये घरगुती वादातून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने दोन मारामारीची तुलना करण्यासाठी गुणदाण देखील केले आहे. क्रमावरा कारणे देत त्याने लिहिले, बागपत चॅट युद्धाशी त्याची तुलना होऊ शकत नाही कारण, 1. कुस्तीपटूंमध्ये चपळाईचा अभाव. 2. क्षेत्रफळाचा योग्य वापर होत नाही. 3. पोलिसांनी लवकर हस्तक्षेप केला. 4. ही एक बचावात्मक लढाई होती जिथे दोन्ही पक्षांनी वाढ न करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, Nagpur: महिलेने ओव्हरटेक केल्याने संतापलेल्या व्यक्तीची महिलेला भरचौकात मारहाण,Watch Viral Video)
शिमला फ्रूट मार्केट व्हिडिओ
दुसर्याने लिहिले, ''बागपतच्या लढाईत अधिक क्रोबॅटिक चाली होत्या.'' तिसरा म्हणाला, ''बागपथच्या लढाईच्या जवळपास यात काहीच नाही.
बागपत व्हिडिओ
काय आहे बागपत प्रकरण
वाचकांच्या माहितीसाठी असे की, बागपतमध्ये चाट विक्रेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीत लोकांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी सशस्त्र होऊन एकमेकांना रस्त्यावर बेदम मारहाण केली होती. भांडणाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे कुर्ता परिधान केलेला मेहेंदी केसांचा विक्रेता आकर्षण ठरला होता. त्याची चपाळाही अनेकांच्या पसंतीतस उतरली होती. हा मेहंदी केसांचा विक्रेता आता इंटरनेटवर 'आइन्स्टाईन चाचा' या नावाने प्रसिद्ध झाला आहे. हरिंदर असे त्याचे नाव असून, त्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्याला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास सहन करावा लागला आहे. ही घटना अजूनही लोकांच्या स्मरणात ताजी आहे आणि तेव्हापासून तो आनंदी मीम्सचा भाग बनला आहे.