Viral Check: शाहरुख खान नव्हे तर 'या' भारतीय व्यक्तीला मिळाला होता Burj Khalifa वर झळकण्याचा पहिला मान (Watch Video)

ANI या वृत्तसंस्थेतर्फे ऑक्टोबर मध्ये शेअर करण्यात आलेलय एका ट्विटनुसार, शाहरुख नव्हे तर महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे बुर्ज खलिफा वर झळकणारे पहिले भारतीय असल्याचे समजत आहे.

Shahrukh khan Birthday Wishes On Burj Khalifa & Mahatma Gandhi On Burj Khalifa (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) याने 2 नोव्हेंबर रोजी वयाच्या 54व्या वर्षात पदार्पण केले. शाहरुखचा वाढदिवस यंदा फार मोठ्या सेलिब्रेशन ऐवजी अगदी घरगुती पद्धतीने पार पडला. पण या दिवसाची सांगता मात्र अगदीच भन्नाट झाली होती. बुर्ज खलिफा (Burj Khalifa) या जगातील सर्वात उंच बिल्डिंगवर शाहरुखच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ शुभेच्छा देण्यात आल्या होत्या, साहजिकच ही गोष्ट शाहरुखच्या फॅन्ससाठी मोठी असल्याने हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला होता. इतकेच नव्हे तर अशा प्रकारे बुर्ज खलिफा वर झळकण्याचा मान मिळवणारा शाहरुख हा पहिलाच भारतीय असल्याचा मॅसेज सुद्धा या व्हिडिओ सोबतच फिरत होता. पण ही बाब तपासून पाहताच हा दावा चुकीचा असल्याचे समोर येत आहे. ANI या वृत्तसंस्थेतर्फे ऑक्टोबर मध्ये शेअर करण्यात आलेलय एका ट्विटनुसार, शाहरुख नव्हे तर महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे बुर्ज खलिफा वर झळकणारे पहिले भारतीय असल्याचे समजत आहे.

शाहरुख खान याने स्वतः हा व्हिडीओ शेअर करत बुर्ज खलिफा इमारतीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले होते. मात्र त्याने आपण असा मान मिळवणारे व्यक्ती असल्याचा कोणताही दावा केला नव्हता.

शाहरुख खान ट्विट

याउलट शाहरुखच्या फॅन्सनी मात्र बुर्ज खलिफा वर झळकणारा शाहरुख हा भारतातीलच नव्हे तर जगातील असा पहिला व्यक्ती आहे इथपर्यंत दावे करत पोस्ट करायला सुरुवात केली होती.

पहा व्हायरल ट्विट

दरम्यान, ANI वृत्तसंस्थेच्या व्हिडीओ नुसार 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त बुर्ज खलिफा वर तिरंग्याच्या पार्श्वभूमीवर गांधीजींची प्रतिकृती झळकली होती तसेच सोबतच वैष्णव जन तो हे भजनही लावण्यात आले होते.यामुळे अर्थातच शाहरुख खान नव्हे तर महात्मा गांधी हे बुर्ज खलिफा वर झळकणारे पहिले भारतीय आहेत हे सिद्ध होते.

ANI ट्विट

असं असलं तरीही शाहरुख खान याला मिळालेला हा मान नक्कीच खास आहे. तसेच यावरून त्याच्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती येते.