Fact Check: आर्थिक अडचणीमुळे 2020-21 मध्ये कर्मचाऱ्यांना पगार न देण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय? PIB ने केला खुलासा
त्यामुळे यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांना 2020-2021 या वर्षात वेतन दिले जाणार नाही. असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) आरोग्य संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांना 2020-2021 या वर्षात वेतन दिले जाणार नाही. असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोना संकटात यापूर्वी अनेक फेक आणि दिशाभूल करणारे मेसेजेस, न्यूज, माहिती समोर आली आहे. आता त्यात या नव्या मेसेजची भर पडली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
आर्थिक अडचणीमुळे रेल्वेने 2020-21 मध्ये त्यांच्या कर्मचार्यांना पगार न देण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान पीआयबी फॅक्ट चेकने या मागील सत्यचा उलघडा केला आहे. हा दावा खोटा असून अशा प्रकारची कोणतीही चर्चा किंवा विचार रेल्वे मंत्रालयाने केलेला नाही, असे पीआयबीकडून ट्विटद्वारे सांगण्यात आले आहे. 2020-2021 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगार किंवा पेन्शन न देण्याचा कोणताही विचार रेल्वे मंत्रालयाचा नाही. अशा प्रकाराचे कोणतेही पाऊल रेल्वेकडून उचलण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण पीआयबकडून देण्यात आले आहे. (रेल्वे प्रवाशांसमोर मोदी सरकारच्या यशाचे गीत गाण्यासाठी तब्बल 3 हजार भिकाऱ्यांची होणार निवड? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा PIB कडून खुलासा)
Fact Check by PIB:
कोरोना व्हायरसचे संकट ओढावल्यापासूनच फेक न्यूजला उधाण आले आहे. दरम्यान अशा प्रकारच्या फेक न्यूजवर विश्वास ठेऊन त्यांना बळी पडू नका, असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. तसंच पीआयबी देखील फेक न्यूज मागील सत्य उघडकीस आणत आहे.
दरम्यान आज सकाळच्या अपडेटनुसार, सध्या भारतात 30,44,941 कोरोना बाधित रुग्ण असून त्यात 7,07,668 सक्रीय रुग्ण आहेत. तर 22,80,567 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील मृतांचा आकडा 56,706 पोहचला आहे.