Prisoners Burn Effigy Of Ravana In Jail: कैद्यांनी कारागृहात जाळला रावणाचा पुतळा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 4 अधिकारी निलंबित
कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी शुक्रवारी सहायक अधीक्षक चंद्रकांत हरिजन, तुरुंगाधिकारी महेश फडते आणि अनिल गावकर आणि सहायक कारागृह रामनाथ गौडे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले.
Prisoners Burn Effigy Of Ravana In Jail: गोव्यातील (Goa) कोलवळे मध्यवर्ती कारागृहातील चार अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तुरुंगातील कैदी रावणाचा पुतळा (Ravana Effigy) जाळताना दिसत आहेत. कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी शुक्रवारी सहायक अधीक्षक चंद्रकांत हरिजन, तुरुंगाधिकारी महेश फडते आणि अनिल गावकर आणि सहायक कारागृह रामनाथ गौडे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले.
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कैद्यांनी रावणाचे दहन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दसरा सणाच्या वेळी रावणाच्या पुतळ्याचे दहन करणे ही भारतभर सामान्य प्रथा आहे. यंदा विजयादशमी म्हणून साजरा होणारा दसरा सण 24 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. (हेही वाचा - CPR to Snake Video:बेशुद्ध पडलेल्या सापाला वाचवण्यासाठी पोलिसाचा सापाला CPR देण्याचा प्रयत्न (Watch Video))
एका अधिकाऱ्याने सांगितले की, निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की पूर्वपरवानगी न घेता कैद्यांना पुतळे जाळण्याची परवानगी कशी दिली, याचे उत्तर तुरुंग अधिकाऱ्यांना द्यावे लागेल. कारागृहाच्या आवारात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी कशी देण्यात आली याचाही तपास केला जाणार आहे. ही घटना तुरुंगाच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करते, असे निलंबन आदेशात त्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण घटनेसाठी तुरुंगातील अधिकाऱ्यांना प्रामुख्याने जबाबदार धरण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.