Fact Check: नागपूर शहरात 59 नव्या कोरोनाबाधितांमध्ये 3 डॉक्टरांचा समावेश अशी सोशल मीडीयात फिरणारी ऑडिओ क्लिप खोटी; PIB in Maharashtra ने केला खुलासा
दरम्यान पीआयबी या सरकारी वृत्त संस्थेने शहानिशा करून सोशल मीडीयामध्ये व्हायरल होणारी ही क्लिप खोटी असल्याचं म्हटलं आहे.
चीनच्या वुहान शहरामधून उत्पत्ती झालेला कोरोना व्हायरस आता जगात काना कोपर्यात पोहचला आहे. दरम्यान ज्या वेगाने कोरोना व्हायरस पसरत त्याच वेगाने या आजाराबद्दल अफवा, चूकीची माहिती, फेक न्यूज देखील पसरत आहेत. महाराष्ट्रातल्या नागपूर शहरामध्येही मागील काही दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल आहे. त्यामुळे सामन्यांची झोप उडाली आहे. सोशल मीडियामध्ये दावा करण्यात आलेल्या माहितीनुसार या ऑडिओ क्लिपमध्ये नागपुर शहरात 59 कोरोनाबाधित असून त्यामध्ये 3 डॉक्टरदेखील आहेत असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान पीआयबी या सरकारी वृत्त संस्थेने शहानिशा करून सोशल मीडीयामध्ये व्हायरल होणारी ही क्लिप खोटी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसबाबत सरकारी यंत्रणेकडूनच दिल्या जाणार्या माहितीवर विश्वास ठेवा असं कळकळीचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये कोरोना व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्या दिवशीच पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती खोटी असल्याचं सांगत अफवांचं खंडन केलं आहे. दरम्यान नागपुरात 4 कोरोनाबाधित असून त्यांची स्थिती उत्तम असल्याचं सांगण्यात आलं आहे. Coronavrius: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात 'हेल्पलाईन नंबर' ची घोषणा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना कोरोना व्हायरस पासून स्वतःला वाचवायचं असेल तर घरीच रहा. कोरोनाशी सामना करायला सरकार सज्ज आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करून सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नये असे आवाहन केलं आहे. दरम्यान आता नागपूर शहरामध्ये वस्तींमध्ये जाऊन होम क्वारंटाईनचा सल्ला दिलेल्यांची विचारपूस, तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Fact Check: केळं खाऊन दूर होते कोरोना व्हायरसचे संक्रमण? पहा या व्हायरल व्हिडीओ मागील सत्य.
PIB Maharashtra
देशाला संबोधित करून लॉकडाऊनची घोषणा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन केलं आहे. सध्या जगभरात अनेक महत्त्वाची शहरं लॉकडाऊन आहेत. त्यामुळे इंटरनेटवर अफवांचं, खोट्या बातम्यांचं पेव फूटलं आहे. जगभरात अमेरिका, इटली, स्पेनमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात 124 कोरोनाबाधित रूग्ण आहेत तर भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 593 च्या वर पोहचला आहे.