बिहार: कोंबड्याची हत्या, सात जणांवर गुन्हा दाखल, पोस्टमार्टमही झाले; पोलिसांकडून तपास सुरु

बिहार (Bihar) राज्यातील कैमूर (Kaimur) जिल्हा अंतर्गत येणाऱ्या दुर्गावती (Durgawti) पोलीस स्टेशन दप्तरी नोंद झालेल्या या गुन्ह्याची बिहार आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. कैमूर तालुक्यातील तिरोजपूर गावात ही घटना घडली.

Rooster | (Photo Credits: PixaBay)

माझा कोंबडा कोणी मारियला.. हे गाणं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. कोबडा मेल्यानंतर त्याच्या आठवणी या गाण्यातून ताज्या करण्याचा प्रयत्न करण्या आला आहे. पण, बिहारमध्ये खरोखरच एका कोंबड्याची हत्या करण्यात आले. या हत्येबाबत पोलिसांमध्ये रितसर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस कोंबड्याच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे कोंबड्याच्या मृत शरीराचे पशुवैद्यकीय दवाखाना (Animal Hospital) येथे शवविच्छेदनही करण्यात आले. बिहार (Bihar) राज्यातील कैमूर (Kaimur) जिल्हा अंतर्गत येणाऱ्या दुर्गावती (Durgawti) पोलीस स्टेशन दप्तरी नोंद झालेल्या या गुन्ह्याची बिहार आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. कैमूर तालुक्यातील तिरोजपूर गावात ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, कैमूर जिल्ह्यातील दुर्गावती पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या तिरोजपूर गावाच्या रहीवासी कमला देवी यांचा एक पोल्ट्री फार्म आहे. कमला देवी यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या एका शेजाऱ्याने पोल्टी फार्ममधीली कोंबडा पकडला आणि त्याला ठार मारले. त्यावरुन शेजाऱ्याशी त्यांचा वाद झाला. दरम्यान, हा वाद इतका टोकाला गेला की, प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले. कमला देवी यांनी आपल्या कोंबड्याची हत्या केल्याचा आरोप करत ही हत्या करणाऱ्या आरोपीचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी केली आहे. प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपीचा तपास सुरु केला आहे.

दरम्यान, कमलादेवी यांनी दिलेल्या फिर्यादीत असेही म्हटले आहे की, आरोपीने (शेजारी) कोंबड्याला तर ठार मारलेच. परंतू, त्या आधी कमलादेवी आणि त्यांचा मुलगा इंदल यालाही मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकारानंतर कमलादेवी यांनी दुर्गावती पोलिसांत तक्रार दिली. (हेही वाचा, अहमदाबाद: डास चावला म्हणून बायको चिडली, नवऱ्याला मुसळाने बदडले)

विशेष म्हणजे हे प्रकरण इथेच थांबत नाही. सध्या कोंबड्याचे मृत शरीर मुख्य पशु रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इथे या कोंबड्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. अद्याप शवविच्छेदन अहवाल आला नाही. मात्र, कमलादेवी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सात जणांवर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूला डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोंबड्याचा मृत्यू हा शरीरातील रक्तपुरवठा खंडीत झाल्यामुळे झाला आहे. शवविच्छेदन अहवाल लवकरच पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे. कैमूर एसपी दिलनवाज अहमद यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, या प्रकरणी प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे.