मटुकनाथ म्हणतायत चढ़ती जवानी- दुसऱ्या ज्युलीच्या शोधात

त्यानंतर मटुकनाथांनी फेसबुकवर चढ़ती जवानी म्हणत आपण दुसऱ्या ज्युलीच्या शोधत आहोत अशी पोस्ट लिहिली आहे.

प्राध्यापक मटुकनाथ चौधरी(फोटो सौजन्य- फेसबुक)

बिहारमध्ये लव्ह गुरु म्हणून ओळख असणारे प्राध्यापक मटुकनाथ चौधरी बुधवारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर मटुकनाथांनी फेसबुकवर चढ़ती जवानी म्हणत आपण दुसऱ्या ज्युलीच्या शोधत आहोत अशी पोस्ट लिहिली आहे. या सर्वांमुळे नेटकऱ्यांनी त्यांना म्हातारचळ लागल्याने आवारा आता अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लव्ह गुरु म्हणून ख्याती असलेल्या मटुकनाथांनी काही वर्षापूर्वी त्यांच्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असेलल्या ज्युली नावाच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर या दोघांनी त्यांचा विवाहित जीवन थाटले होते. परंतु वर्षभरापूर्वीच ज्युलीने संन्यासी होण्याचे ठरविले आणि त्यांच्या आयुष्यातून निघून गेली. तर मटुकनाथ हे विश्वविद्यालयात हिंदीचे धडे विद्यार्थ्यांना आजवर देत आले. मात्र 40 वर्षानंतर मटुकनाथ सेवानिवृत्त झाले आहेत. मटुकनाथ यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, 'मी 65 वर्षांचा तरुण असून माझ्यातले तारुण्यपण अजूनही कमी झालेले नाही. तर या तारुण्याला लोकांची नजर लागत आहे. तसेच सेवानिवृत्तीनंतरचे पुढचे आयुष्य आनंदात घालवायचे असल्याने मी नव्या ज्युलीच्या शोधात असल्याचे पोस्टद्वारे सांगितले आहे'.

तसेच मटुकनाथ यांच्यासाठी नव्या ज्युलीची निवड चक्क त्यांचे विद्यार्थी करणार आहेत. तर माणसाच्या आयुष्यात सुख येण्यासाठी दुसऱ्या माणसाची जोड असावी लागते असे पोस्टच्या शेवटी लिहिले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी मटुकनाथ यांची चांगलीच शाळा घेत त्यांच्या पोस्टखाली प्रतिक्रिया देऊन काहींनी शुभेच्छा तर काहींनी शिव्या दिल्या आहेत.