VIDEO: क्रुझ जहाजावरून पडून प्रवाशाचा मृत्यू, 40 मिनिटांनंतर सापडला मृतदेह (Watch Video)

नॉर्वेजियन स्पिरिट क्रूझ जहाजातून एक प्रवासी समुद्रात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंगाला काटा आणणारा या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रूझ जहाज तैवानला परत जात असताना ही घटना घडली.

VIDEO: क्रुझ जहाजावरून पडून प्रवाशाचा मृत्यू, 40 मिनिटांनंतर सापडला मृतदेह (Watch Video)
VIDEO: photo credit TWITTER

VIDEO: नॉर्वेजियन स्पिरिट क्रूझ जहाजातून एक प्रवासी समुद्रात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंगाला काटा आणणारा या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रूझ जहाज तैवानला परत जात असताना ही घटना घडली. ही घटना 8 ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेचा एकाने व्हिडिओ फोनमध्ये कैद केले आहे. प्रवासी थेट वरतून खाली पडला आहे. प्रवाशी वरतून खाली कशा पडला याचा शोध सुरु आहे. (हेही वाचा- भरधाव कारची पादचाऱ्याला धडक, व्यक्तीचा जागीच मृत्यू, हैद्राबाद येथील घटना)

प्रवासी पडताच जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने शोधमोहिम सुरु केली. पडलेल्या व्यक्तीचा शोध घेता यावा यासाठी सुमारे ४० मिनिटे जहाज थांबवण्यात आले. मात्र, काही वेळाने त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. समुद्रात पडलेला व्यक्ती तैवान येथील नागरिक होता. ली असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे क्रूझवरील इतर प्रवाशांनाही मोठा धक्का बसला आहे.

पाहा व्हिडिओ

या घटनेनंतर क्रूझवरील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. क्रूझ जहाजाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या दु:खद घटनेबाबत अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2024 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).