NEET-UG Exam 2020 परीक्षा ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबणीवर? NTA च्या नावे दावा केलेल्या खोट्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेज बद्दल PIB ने केला खुलासा

'NEET-UG परीक्षा पुढे ढकलली असून ती ऑगस्टमध्ये होणार हा व्हायरल वॉट्सअ‍ॅप मेसेज खोटा असून विद्यार्थ्यांनी अधिकृत सुत्रांकडून दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन

Fake News of NEET-UG Exam 2020 Postponed to August (Photo Credits: PIB)

सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये National Testing Agency (NTA)ने यंदाची NEET-UG Exam 2020 परीक्षा ऑगस्ट महिन्यात पुढे ढकलली आहे असा मॅसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमुळे आता अनेक वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र PIB Fact Check च्या अकाऊंटवरून हा व्हायरल मेसेज आणि त्यामधील दावा खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान मे महिन्यात केंद्रीय मनुष्यबळ आणि मानव संसाधन मंत्री Ramesh Pokhriyal Nishank यांनी NEET 2020 Exam परीक्षा 26 जुलै दिवशी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान सध्या व्हायरल होत असलेले मेसेज ही अफवा आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. केवळ अधिकृत सुत्रांद्वारेच माहिती जाणून घ्या असं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

दरम्यान 'NEET-UG परीक्षा पुढे ढकलली असून ती ऑगस्टमध्ये होणार असल्याचा दावा करणारी नॅशनल टेस्टींग एजन्सी च्या नावे एक खोटी जाहीर सूचना व्हाट्सअप द्वारे पसरवली जात आहे. मात्र हे वृत्त खोटे असून ही अफवा आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. केवळ अधिकृत सुत्रांद्वारेच माहिती जाणून घ्या. असे PIB ने ट्वीट केले आहे. National Test Abhyas App: यंदा JEE, NEET 2020 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन अ‍ॅप वर तयारी जोरात; सुमारे 10 लाख जणांनी दिल्या Mock Tests

PIB Fact Check Tweet

5 मे दिवशी पोखरियाल यांनी लाईव्ह संवाद साधत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांला उत्तरं दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच अभ्यास, आगामी शैक्षणिक वर्ष, कोरोना संकटात मानसिक आतोग्य कसं जपायचं, ताण कसा कमी करायचा याची माहिती दिली. यावेळी त्यांनी कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या परीक्षांचं नवं वेळापत्रक देखील जाहीर केलं. त्या संवादामध्येच नीटची परीक्षा 26 जुलै दिवशी होईल तर जेईई मेन्सची परीक्षा 18, 20, 21, 22, 23 जुलै 2020 मध्ये होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. तर आयआयटी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा यंदा ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहे.