Mumbai: मरीन ड्राइव्ह आणि गेटवे ऑफ इंडिया येथे बुडणाऱ्या 59 वर्षीय महिलेसह 3 जणांना वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी घेतली समुद्रात उडी (Watch Video)

मात्र, तिची बॅग पाण्यात पडली आणि ती काढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पाय घसरला आणि ती समुद्रात पडली. दुपारी 2.45 च्या सुमारास मरीन ड्राइव्ह पोलिसांना एक महिला समुद्रात पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर याठिकाणी दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी समुद्रात उडी घेत महिलेचा जीव वाचवला.

Mumbai Police jump into sea to save 3 people (PC - Instagram)

Mumbai: मुंबईतील (Mumbai) दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये, पोलिसांनी गुरुवारी मरीन ड्राईव्ह (Marine Drive) येथून 59 वर्षीय महिलेची आणि गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे इतर तिघांची सुटका केली. प्राप्त माहितीनुसार, यातील एका घटनेत, भरती-ओहोटीच्या जोरदार लाटा स्मारकाच्या किनाऱ्यावर आदळल्याने तिघेजण समुद्रात पडले आणि किरकोळ जखमी झाले.

मरीन ड्राइव्ह भागात स्वाती कनानी नावाची महिला घटनास्थळी हवामानाचा आनंद घेत होती. मात्र, तिची बॅग पाण्यात पडली आणि ती काढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पाय घसरला आणि ती समुद्रात पडली. दुपारी 2.45 च्या सुमारास मरीन ड्राइव्ह पोलिसांना एक महिला समुद्रात पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर याठिकाणी दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी समुद्रात उडी घेत महिलेचा जीव वाचवला. (हेही वाचा - Car Catches Fire In Andheri: अंधेरी मध्ये गोखले पूलावर कारला लागली आग; सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवली)

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

दरम्यान, पीडित महिलेला ताबडतोब जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून तिच्या बहिणींना या घटनेची माहिती देण्यात आली. गेटवे ऑफ इंडियावर हवामानाचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. (हेही वाचा - Viral Video: रील बनवण्यासाठी समुद्रात घेऊन गेले कार, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ)

भिंतीवर आदळणाऱ्या शक्तिशाली लाटांनी या तीघांना खाली ढकलले. यात हे तीनही जण किरकोळ जखमी झाले. भरती-ओहोटीच्या वेळी, गेटवे ऑफ इंडियावर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाला ताबडतोब सावध केले आणि त्यांना भिंतीपासून दूर राहण्यास सांगितले.