Mumbai Cop rescued Python in Dharavi: धारावी मधील घरात मुंबई पोलिसाने केली 6 फूटी अजगराची यशस्वी सुटका; पहा वायरल व्हिडिओ
त्यानंतर तो सोशल मीडीयात वायारल होण्यास सुरूवात झाली.नेटकर्यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना पोलिस कर्मचार्यांच्या धाडसाचं कौतुक केले आहे
मुंबईत धारावी (Dharavi) मध्ये एका घरात 6 फूट लांबीचा अजगर आढळल्याने स्थानिकांमध्ये खळबळ पसरली होती. दरम्यान मुंबई पोलिस (Mumbai Police) खात्यातील एका जिगरबाज कर्मचार्याने त्याला घरामधून बाहेर काढून जवळची जंगलात सुरक्षित सोडल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सध्या या पोलिस कर्मचार्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान ही घटना काल 31 डिसेंबर ची आहे. आज मुंबई पोलिस खात्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर त्याचा एक व्हिडिओ शेअर करून जिगरबाज पोलिस कर्मचार्याचं कौतुक केलं जात आहे. अजस्त्र अजगराच्या विळख्यात अडकला, ताकदीनिशी प्रयत्न करुनही बाहेर पडणे झालं कठीण; पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ.
अजगराची सुटका करताना काहींनी हा व्हिडिओ मोबाईल मध्ये शूट केला होता. त्यानंतर तो सोशल मीडीयात वायारल होण्यास सुरूवात झाली.नेटकर्यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना पोलिस कर्मचार्यांच्या धाडसाचं कौतुक केले आहे. हा Indian Rock Python होता. तर घरातून त्याची सुखरूप सुटका करणारे कुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मुरलीधर जाधव (PC Murlidhar Jadhav) होते. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेले असतानाही त्यांनी अजगराला सुखरूप घरातून बाहेर कढून जंगला सोडले आहे.
मुंबई पोलिस ट्वीट
मुंबईमध्ये अशाप्रकारे अजगर आढळण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. वर्षभरापूर्वी धारावी नजीकच वांद्रे भागातही अशाप्रकारे अजगर आढळले होते. 24 तासांत 8 फूट लांबीचे दोन अजगर आढळल्याने काही काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते.