MLA Narayan Kuche Dance Video: आमदार नारायण कुचे यांचा डिजेच्या तालावर वरात डान्स, व्हिडिओ व्हायरल

या वेळी त्याना रस्त्यावर वरात पाहिली. या वरातीमध्ये तरुण मंडळी डान्स करत होती. हे पाऊन आमदार कुचे यांनाही डान्स ( MLA Narayan Kuche Dance Video) करण्याचा मोह आवरला नाही.

MLA Narayan Kuche | (Photo Credits: YouTube)

जालना येथील बदनापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायण कुचे ( MLA Narayan Kuche ) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नारायण कुचे हे लोकांमध्ये वरात डान्स (Varat Dance) करताना दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार, आमदार कुचे हे शेतकरी वीजबिलाबाबत आंदोलन करुन परतत होते. या वेळी त्याना रस्त्यावर वरात पाहिली. या वरातीमध्ये तरुण मंडळी डान्स करत होती. हे पाऊन आमदार कुचे यांनाही डान्स ( MLA Narayan Kuche Dance Video) करण्याचा मोह आवरला नाही. या डान्सचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नवरदेवाची वरात आणि त्यासमोर नाचणारी मंडळी पाहून आमादर कुचे यांनीही आपली गाडी थांबवली. ते वरातीत नाचणाऱ्या तरुणांमध्ये गेले आणि डीजेच्या तालावर ठेका धरला. त्यानंतर नवरदेवाला शुभेच्छा दिल्या आणि ते पुढे मार्गस्त झाले. आमदारांनीही आपल्याबरोबर ठेका धरल्याचे पाहून मग नाचणाऱ्या मंडळींना अधिकच हुरुप आला. त्यांनी मग अधिकच जोमाने नाचायला सुरुवात केली.

दरम्यान, आमदार कुचे हे वरात डान्स करत असताना कोणीतरी त्याचा व्हिडिओ चित्रीत केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजकीय व्यक्ती, स्पोर्टपर्सन आणि सेलिब्रेटी आदी मंडळींवर सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच लक्ष असते. अगदी सर्वसामान्य गोष्टही त्यांनी काहीशा ढंगात केली की लगेच त्याची बातमी होते किंवा चर्चा सुरु होते. मग तो पोशाख असो, वक्तव्य असो, रिलेशन असो किंवा डान्स असो. या मंडळींच्या कशाचीही बातमी केली जाते. आता तर डीजिटल मीडियाच्या जमान्यात सगळेच कसे लाईव्ह झाले आहे. त्यामुळे असे काही दिससेल की लगेचच लोकांचे कॅमेरे सरसावतात.