PPE किट घालून विवाहसोहळ्यात व्यक्तीचा जबरदस्त डान्स; पहा व्हायरल व्हिडिओ
यात अजून एका व्हिडिओजची भर पडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.
Viral Video: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात सोशल मीडियावर (Social Media)अनेक आगळेवेगळे व्हिडिओज व्हायरल होताना पाहायला मिळाले. यात अजून एका व्हिडिओजची भर पडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती पीपीई किट (PPE Kit) घालून विवाहसोहळ्यात (Wedding Ceremony) डान्स करत आहे. हा भन्नाट डान्स व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने पसरत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला होम आयसोलेशनचा (Home Isolation) सल्ला देण्यात आला होता. मात्र विवाहसोहळ्याला जाण्याची उत्सुकता इतकी अधिक होती की तो चक्क पीपीई किट घालून तेथे दाखल झाला आणि डान्सही केला.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ जोधपूर येथील असल्याचे बोलले जात आहे. मात्र जोधपूर मधील नेमका कोणत्या ठिकाणाचा हा व्हिडिओ आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्याची हौस त्याने अशी भागवून घेतली. (PPE किटपासून बनवलेला हँड मेड ड्रेस घालून गुजरात मधील फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी घेतला गरब्याचा आनंद, Watch Video)
IANS Tweet:
या व्यक्तीने लग्नसोहळ्याचा पुरेपूर आनंद घेतला असल्याचे व्हिडिओतून दिसून येते. कठीण प्रसंगातही आनंदी राहण्याचा दाखला जरी या व्हिडिओतून मिळत असला तरी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.