बायकोचा सेक्स व्हिडिओ नवऱ्याने पाहिला, मुलांसमोर झाडल्या गोळ्या

तेही या घटनेत ठार झाले. त्याने 9 एमएम पिस्तूलातन गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. ही घटना नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान घडली. पोलिसांनी विल्यमला ताब्यात घेतले आहे.

Extramarital affairs | (Archived and representative images)

अमेरिकेतील (America) फ्लोरिडा (Florida)शहरात एका व्यक्तीने एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या व्यक्तीने त्या महिलेच्या आई, वडीलांनाही गोळ्या घालून ठार मारले. हे सर्व कृत्य त्याने त्यांच्या मुलांसमोरच केले. या घटनेच्या धक्क्यामुळे मुलांवर मोठा आघात झाला आहे. मुले अद्यापही या धक्क्यातून सावरु शकली नाहीत. पत्नीची सेक्स व्हिडिओ टेप (Sex Video Tape) पतीला आवडला नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे समजते.

'द सन' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार गोळ्या घालणारा व्यक्ती आणि मृत महिला हे पतीपत्नी होते. पतीचे नाव विल्यम स्टिलवेल होते तर पत्नीचे नाव मोना असे होते. दोघांनाही पाच वर्षांची दोन जुळी मुले आहेत. विल्यम हा मोनावर गोळ्या झाडत होता तेव्हा, त्याची मुले रडता रडता त्याल अर्जव करत होती. पापा, प्लिज मम्मीला मारु नका. अशा प्रकारे मरताना आम्ही तिला पाहू शकत नाही. मुले अशी अर्वजव करत असताना त्याने हे कृत्य केले. दरम्यान, जखमी अवस्थेत पडलेली मोना आपल्या मुलांना घरातून पळून जाण्याबाबत सांगत होती. दरम्यान, हा प्रकार घडत असताना निर्माण झालेल्या आवाजामुळे दोन मुले आणि तिन कुत्रे कसेबसे घराबाहेर पळाले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. (हेही वाचा, बायकोने घातला असा ड्रेस की, चक्क नवऱ्याने साप समजून पायच मोडला!)

दरम्यान, पत्नीवर गोळ्या झाल्यानंतर विल्यमने त्याचे सासू आणि सासरे यांच्यावरही गोळीबार केले. तेही या घटनेत ठार झाले. त्याने 9 एमएम पिस्तूलातन गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. ही घटना नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान घडली. पोलिसांनी विल्यमला ताब्यात घेतले आहे. घरातील साहित्य हाताळत असताना विल्यमला पत्नी मोनाची एक सेक्स व्हिडिओ टेप हाती लागली. हा आपलाच व्हिडिओ असेल असे वाटल्याने त्याने तो पाहिला. तर, या व्हिडिओत ती तिच्या जवळच्या मित्रासोबत शरीरसंबंध (सेक्स) करताना दिसत होती. पत्नीचा हे कृत्य आणि व्हिडिओ त्याला आवडला नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले.