धक्कादायक! कॅनडा मधील क्युबेक शहरातील महामार्गावर एका छोट्या विमानाने केले 'Emergency Landing', पाहा काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य, Watch Video

हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल या विमानाच्या पायलट ने अगदी सहजरित्या महामार्गावर लँडिंग केले असून अन्य गाड्यांच्या मधोमध अगदी आरामात विमान चालवित आहे.

Plane Makes Emergency Landing (Photo Credits: @Lauthfee/ Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत लोक घरी अडकून पडल्यामुळे अक्षरश: कंटाळली आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यास तुमचे लक्ष लॉकडाऊन आणि कोरोना पासून थोडे विचलित होऊ शकते. या व्हिडिओमध्ये चक्क एक छोट्या विमानाने महामार्गावर इमर्जन्सी लँडिंग केली आहे. हा व्हिडिओ आहे कॅनडातील (Canada) क्युबेक शहरातील(Quebec City). हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल या विमानाच्या पायलट ने अगदी सहजरित्या महामार्गावर लँडिंग केले असून अन्य गाड्यांच्या मधोमध अगदी आरामात विमान चालवित आहे.

हा घटना घडली 16 एप्रिलच्या सकाळच्या सुमारास. या विमानाच्या पायलट ने येथील अग्निशमन विभागाकडून महामार्गावर लँडिंग करण्याची परवानगी मागितली. त्या विमानात काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांना हे लँडिंग करावे लागले. त्याच्या महामार्गापासून Jean-Lesage आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर होते. Monkey Flying Kite: गच्चीवर बसून चक्क माकडाने मजेत उडवला पतंग; लॉक डाऊनमध्ये वेगाने होत आहे Evolution, पहा Video

पाहा व्हिडिओ:

काळजाचा ठोका चुकविणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एका गोष्टीची खात्री पटेल की हे चालविणारा वैमानिक किती कुशाग्र पद्धतीने ही परिस्थिती हाताळत आहे. दरम्यान क्युबेक शहरात 15,857 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 630 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.