'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र

तसेच, आपण महाराष्ट्रात येऊन विनोदी तावडेंना आपल्या गाडीत बसू द्यावे. जेनेकरुन त्यांची गृहमंत्री पद न मिळाल्याची इच्छा जरी अपूर्ण राहिली असली तरी, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गाडीत बसण्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे ते पुन्हा सामान्य माणसासारखे वागू लागतील', असे या पत्रात म्हटले आहे.

Vinod Tawde Insulted by Rajnath Singh Security Guard | (Photo Credits: Youtube)

Lok Sabha Elections 2019: गजानन काळे (Gajanan Kale) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) शहर अध्यक्ष नवी मुंबई (New Mumbai) यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याबाबत थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनाच पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर खास करुन ट्विटरवर व्हायरल झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार न उभे करता सत्ताधारी भाजप आणि प्रामुख्याने पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यावर जाहीर सभांतून टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या सभांना जनतेतून मिळणारा उत्स्फूर्थ प्रतिसाद पाहून भाजप नेतेही बिथरले असून, राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत टीका करु लागले आहेत. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यात आघाडीवर आहेत. विनोद तावडे यांच्याकडून राज ठाकरे यंच्यावर होणाऱ्या टीकेला नवी मुंबईचे मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रातून दिलेले प्रत्युत्तर सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. 'महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना मानसोपचाराची गरज आहे. तसेच, आपण महाराष्ट्रात येऊन विनोदी तावडेंना आपल्या गाडीत बसू द्यावे', अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

या पत्रात चक्क 'महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना मानसोपचाराची गरज आहे. तसेच, आपण महाराष्ट्रात येऊन विनोदी तावडेंना आपल्या गाडीत बसू द्यावे. जेनेकरुन त्यांची गृहमंत्री पद न मिळाल्याची इच्छा जरी अपूर्ण राहिली असली तरी, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गाडीत बसण्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे ते पुन्हा सामान्य माणसासारखे वागू लागतील', असे या पत्रात म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: मनसेच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात मारलेल्या थापा मोजा - राज ठाकरे यांचा भाजपाला टोला)

गजानन काळे यांचे ट्विट

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभांतील भाषणे जनता, प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप सरकार सध्या राज ठाकरे यांच्या रडारवर आहेत. विशेष म्हणजे जाहीर सभांमधून राज ठाकरे यांनी भाषणाचे एक नवेच तंत्र शोधून काढले आहे. ज्याचा प्रभाव उपस्थितांमध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील व्हिडिओ क्लिप्स दाखवत आहेत. त्यामुळे भाषणादरम्यान एक मोठा परिणाम उपस्थितांवर पाहायला मिळतो आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आता राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

राजनाथ सिंह यांचा सुरक्षारक्षक विनोद तावडे यांची कारमध्ये घुसखोरी रोखताना (व्हिडिओ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली अश्वासने आणि भाजप सरकारने राबवलेली कार्यपद्धती याची जाहीर पोलखोल ठाकरे आपल्या भाषणातून करत आहेत. भाषणादरम्यान ठाकरे यांनी भाजपाने जाहिरात केलेल्या डीजिटल व्हिलेज हरिसालचा पर्दाफाश केल्याचे भाजपच्या जव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजप नेते राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देऊ पाहात आहे. दरम्यान, मनसे आणि भाजप यांच्यात रंगलेला हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला लोकसभा निवडणूक संपेपर्यंत रंगण्याची चिन्हे आहेत.