Lockdown मध्ये दोन्ही बायकांना भेटायला जायची परवानगी द्या; दोन लग्न केलेल्या पतीची दुबई पोलिसांकडे विचित्र विनवणी
माझी दोन लग्न झालीयेत मला दोघींसोबत राहण्याची इच्छा आहे त्यामुळे एक दिवस आड दोघींकडे जाण्याची परवानगी द्या अशी पोलिसांना विनवणी केल्याची एक घटना दुबई मध्ये घडली आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यामुळे संपूर्ण जग थांबून गेले आहे, प्रत्येकजण आपापल्या घरात अडकून पडला आहे. अशावेळी केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची परवानगी आहे मात्र यासाठी सुद्धा बरीच प्रक्रिया करावी लागतेय. अशात एका व्यक्तीने घराबाहेर पडण्यासाठी एक विचित्र कामाचा बहाणा केला आहे. माझी दोन लग्न झालीयेत मला दोघींसोबत राहण्याची इच्छा आहे त्यामुळे एक दिवस आड दोघींकडे जाण्याची परवानगी द्या असे या इसमाचे म्हणणे आहे. त्यासाठी त्याने चक्क पोलिसांना विनवणी केली आहे. अर्थात ही विनवणी पोलिसांनी फेटाळून लावली आहे मात्र या प्रसंगानंतर आपली अक्षरशः हसू की चिडू अशी परिस्थिती झाल्याचा अनुभव पोलिसांनी सांगितला आहे. हा प्रकार दुबई (Dubai) मध्ये घडला असून गल्फ न्यूजने याबाबत माहिती वृत्त दिले आहे. धक्कादायक! Lockdown मुळे पतीसोबत वारंवार Sex करुन दमलेल्या घाना शहरातील महिलेने सरकारकडे मांडली आपली व्यथा; केली ही 'विचित्र' मागणी, Watch Video
प्राप्त माहितीनुसार, दुबई पोलिसांचा एक अधिकारी स्थानिक रेडिओवरून कॉलद्वारे लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. यादरम्यान, या दोन बायकांच्या पतीने कॉल केला 'मी दोन स्त्रियांशी लग्न केले आहे. मला दोन्ही महिलांना घरी जाण्यासाठी परवानगी मिळेल का?' असा प्रश्न या महाभागाने करताच पोलिसांनी त्याला अगदी हुशारीने उत्तर दिले, अशा प्रश्न येण्याचा काही पहिला प्रसंग नाही , मला असे बरेच प्रश्न आले आहेत. पण घराबाहेर पाडण्याचे परमिट फक्त एकदाच मिळेल आणि त्यासाठी सुद्धा तुमचे कारण जीवनावश्यक असायला हवे. जर या छोट्यामोठ्या गोष्टींसाठी बाहेर पडण्याची परवानगी दिली तर सर्वच जण मागे लागतील आणि कोरोना आणखीन वाढेल. असे सांगत या पोलिसाने या इसमाची समजूत घातली.
दरम्यान, दुबई मध्ये शुक्रवार पर्यंत 6,302 कोरोना रुग्ण आढळले आहे. 37 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. अलीकडेच कोरोनावरील उपचारात मदत म्ह्णून भारताकडून दुबईला 5.5 मिलियन Hydroxychloroquine गोळ्या पुरवण्यात आल्या होत्या.