Ram Aayenge In Lata Mangeshkar AI Voice: लता मंगेशकर यांच्या एएल जनरेट केलेल्या आवाजातील 'राम आयेंगे' गाणं व्हायरल; नेटिझन्स म्हणाले, 'Ultra Melodious'

याशिवाय, आणखी एका यूजरने म्हटलं आहे, 'अरे देवा मला अश्रू येत आहेत.. हे सुंदर आहे.. फक्त.. सुंदर.' दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, 'पहिल्यांदा AI ने काहीतरी उत्कृष्ट केले... हे अत्यंत मधुर आहे.'

In Lata Mangeshkar (PC- Wikimedia Commons)

Ram Aayenge In Lata Mangeshkar AI Voice: अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) भव्य अभिषेक सोहळ्यापूर्वी, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या आवाजातील 'राम आयेंगे' (Ram Aayenge) या लोकप्रिय गाण्याचा एक ऑडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. सध्या अनेकजण रामावर आधारित भजन गाऊन अनेकजण ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातचं आता नेटिझन्स लता मंगेशकर यांच्या आवाजातील एआय-जनरेट केलेल्या गाणं ऐकून प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त करत आहेत.

एका वापरकर्त्याने त्याच्या अधिकृत X खात्यावर ऑडिओ शेअर केला आणि लिहिले आहे की, एआयचा आतापर्यंतचा सर्वात योग्य वापर. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच, एका वापरकर्त्याने कमेंट केली की, "सच कहूं इससे अच्छा और कोई नहीं है असली वाला तो मैं कभी सुनता नहीं था इसे पुरा सुना" (हेही वाचा -अमेरिकेमध्ये Tesla Musical Light show मध्ये घुमला 'जय श्री राम' चा नारा! (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

दुसर्‍या एका यूजरने लिहिले आहे की, 'अरे!! लताजींच्या आवाजातील हे गाणे ऐकून माझे डोळे भरून आले आहेत आणि माझ्या मनाला पूर्ण शांती मिळाली आहे. 🙏 शेअर केल्याबद्दल धन्यवाद आणि ज्याने हे केले त्यांचे आभार. लता जी तुमचा आवाज नेमही अमर राहिल.' याशिवाय, आणखी एका यूजरने म्हटलं आहे, 'अरे देवा मला अश्रू येत आहेत.. हे सुंदर आहे.. फक्त.. सुंदर.' दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, 'पहिल्यांदा AI ने काहीतरी उत्कृष्ट केले... हे अत्यंत मधुर आहे.'

युट्यूबवर प्रथम एआय-जनरेट केलेले गाणे शेअर करणार्‍या वापरकर्त्याने लिहिले, या गैर-व्यावसायिक व्हिडिओमध्ये वाजवी वापराच्या अंतर्गत परिवर्तनाच्या उद्देशाने सिंथेटिक आवाज आहेत, विशिष्ट व्यक्तींचे अनुकरण करण्याचा हेतू नाही. हे ओपन-सोर्स टूल्स आणि माझ्या ध्वनी अभियांत्रिकीचे मिश्रण आहे. संगीताच्या प्रेमातून आणि कलाकारांच्या सन्मानार्थ तयार केले गेले आहे, हे कार्य फायद्यासाठी नाही, सन्माननीय आहे.

दरम्यान, मूळ गाणे स्वाती मिश्रा यांनी गायले आहे, ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही प्रशंसा मिळाली आहे. पंतप्रधानांनी X वर स्वाती मिश्रा यांचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, "श्री राम लल्लाच्या स्वागतासाठी स्वाती मिश्रा जी यांचे हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे." 22 जानेवारी रोजी होणार्‍या उद्घाटनाच्या स्वागताचा एक मार्ग म्हणून तिचे भजन घेण्यात आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement