Lakhimpur Kheri Shocker: पाळीव कुत्र्याची तक्रार केल्याने तरुण संतापला, तक्रार करणाऱ्या तरुणींना केली काठीने मारहाण
सध्या यूपीमधील लखीमपूर खेरी येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक दबंग तरुण दोन मुलींना काठीने मारहाण करताना दिसत आहे. गोला येथील मोहम्मदी रोडवर असलेल्या मोहल्ला मुन्नूगंजमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी आरोपी तरुणाने कुत्रा पाळला आहे, त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होतो. मुलींनी तक्रार करण्याचे धाडस केले असता तरुण संतप्त झाला आणि त्याने त्यांना मारहाण केली.
Lakhimpur Kheri Shocker: सध्या यूपीमधील लखीमपूर खेरी येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक दबंग तरुण दोन मुलींना काठीने मारहाण करताना दिसत आहे. गोला येथील मोहम्मदी रोडवर असलेल्या मोहल्ला मुन्नूगंजमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी आरोपी तरुणाने कुत्रा पाळला आहे, त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होतो. मुलींनी तक्रार करण्याचे धाडस केले असता तरुण संतप्त झाला आणि त्याने त्यांना मारहाण केली. तरुणी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे, मात्र तरुणाचा राग काही कमी झाला नाही. या घटनेबाबत मुलींनी गोला पोलिस स्टेशनला तक्रार पत्र दिले आहे. हे देखील वाचा: Viral Video: मित्राच्या लग्नात तरुणाला स्टेजवर हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू, कुरनूल जिल्ह्यातील व्हिडिओ व्हायरल
येथे पाहा घटनेचा व्हिडीओ:
लखीमपुर खीरी
दो लड़कियों को यह दबंग इसलिए पीट रहा है, क्योंकि लड़कियों ने इससे कहा था अपने कुत्ते को बांधकर रखो सबको काट रहा है, रास्ता से निकलने नहीं देता,
फिर क्या था दबंग जी लाठी लेकर गालियों सहित लड़कियों पर जुट पड़े , एक लड़की को सड़क पर गिरा दिया,
घटना गोला के मोहम्मदी… pic.twitter.com/gnZM9wIeAd
— Cnews Bharat (@cnews_bharat) November 21, 2024
पाळीव कुत्र्याबद्दल तक्रार केल्याने तरुण संतापला
या घटनेने यूपीमधील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटना रोज समोर येत असल्याने महिला आणि त्यांचे कुटुंब असुरक्षित वाटत आहे. सोशल मीडियावर लोकांनी याला महिलांवरील हिंसाचार म्हटले असून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. सध्या तरी याप्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2024 09:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

