'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल!

या मल्टीस्टारर सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र सिनेमा पाहुन प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

Kalank Movie Memes Viral (Photo Credits: Twitter)

करण जोहर (Karan Johar) निर्मित 'कलंक' (Kalank) सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होती. या मल्टीस्टारर सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा या सिनेमाने प्रेक्षकांची चांगलीच निराशा केली. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या मीम्स वरुन प्रेक्षकांची निराशा प्रकट होते. (कलंक' मधील 'घर मोरे परदेसीया' गाणे 20 तासात 1 करोड लोकांनी पाहिले, अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दांची चालली जादू)

मीम्स:

 

माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट, करण जोहरची निर्मिती, अभिषेक वर्मन यांचे दिग्दर्शन यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. त्याचबरोबर सिनेमाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनी सिनेमाबद्दलची उत्सुकता, उत्कंठता अधिकच वाढवली होती. मात्र मीम्सवरुन सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षेस पात्र ठरला नाही, असे दिसून येते.