Italy's 10-Second Groping Rule: आपल्या Private Parts वर हात ठेवून मुले-मुली बनवत आहेत व्हिडिओ; सोशल मिडियावर व्हायरल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
सोशल मीडियावर 10secodi असा हॅशटॅगद्वारे केअरटेकरवरील लैंगिक छळाचे आरोप हटवल्याचा निषेध करण्यात येत आहे. इंस्टा आणि टिक टॉकवर लोक व्हिडीओ बनवत आहेत ज्यात मुले-मुली 10 सेकंद त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर हात ठेवून सांगत आहेत की जे घडले ते योग्य नाही.
सध्या इटलीच्या (Italy) सोशल मीडियावर #10 secodi चे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये महिला 10 सेकंदांसाठी त्यांच्या स्तनांवर आणि इतर प्रायव्हेट पार्टवर हात ठेवताना दिसत आहेत. अनेक व्हिडिओंमध्ये मुलेही त्यांच्या प्रायव्हेट पार्टला 10 सेकंद स्पर्श करताना दिसतात. हा एक प्रकारचा निषेध आहे, जो एका इटालियन न्यायाधीशाविरुद्ध चालू आहे. या न्यायाधीशाने लैंगिक अत्याचाराच्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतचा आदेश देताना न्यायाधीशाने म्हटले होते की, 'एखाद्या व्यक्तीला 10 सेकंदांपेक्षा कमी अयोग्यरीत्या स्पर्श करणे लैंगिक छळ नाही'.
या व्यक्तीवरील लैंगिक छळाचे आरोप काढून टाकल्याबद्दल आता जनता त्याचा विरोध करत आहे. लोक सोशल मीडियावर स्वतःच्या प्रायव्हेट पार्टसला 10 सेकंद स्पर्श करत व्हिडिओ बनवत आहेत. या निर्णयाविरोधात मुलेही आंदोलन करत आहेत. या व्हिडिओंमध्ये मुले-मुली 10 सेकंदांसाठी त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर हात ठेवून हा निर्णय किती चुकीचा आहे हे सांगत आहेत. तसेच, ‘10 सेकंदांपेक्षा कमी काळासाठी एखाद्यावर लैंगिक अत्याचार झाला तर तो लैंगिक अत्याचार मानला जाणार नाही का?’, असा प्रश्नही विचारला जात आहे. हे व्हिडिओ जगभरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काय प्रकरण आहे?
इटलीची राजधानी रोममधील रोम हायस्कूलमधील 17 वर्षीय मुलीने शाळेचा 66 वर्षीय केअरटेकर अँटोनियो अवोला याच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला 3.5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. एप्रिल 2022 मध्ये मुलगी जेव्हा पायऱ्या चढत होती तेव्हा तिला वाटले की तिची पॅंट खाली घसरली आहे. त्यानंतर अचानक मागून एक हात तिच्या नितंबावर ठेवण्यात आला आणि तिची अंतवस्र्त्रे ओढली गेली. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, तो एक प्रकारची चेष्टा करत होता. (हेही वाचा: Longest Kiss World Record: जगप्रसिद्ध चुंबन, तब्बल 58 तास किस करत जोडप्याने गेला विश्वविक्रम; Guinness नेही घेतली दखल)
यानंतर पीडितेने केअरटेकरची तक्रार पोलिसांकडे दिली. केअरटेकरने कबूल केले की त्याने केलेल्या कृत्याला मुलीची संमती नव्हती. पण त्याने जे केले ते एक विनोद होता. यासाठी केअरटेकरला साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. परंतू एका आठवड्यात केअरटेकरची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशाने सांगितले की, जे घडले त्याला गुन्हा मानता येणार नाही कारण ते 10 सेकंदांपेक्षा कमी काळ घडले.
यानंतर मुलीने तिची शाळा आणि न्याय व्यवस्था या दोघांकडून फसवणूक झाल्याचे सांगितले. आता सोशल मीडियावर 10secodi असा हॅशटॅगद्वारे केअरटेकरवरील लैंगिक छळाचे आरोप हटवल्याचा निषेध करण्यात येत आहे. इंस्टा आणि टिक टॉकवर लोक व्हिडीओ बनवत आहेत ज्यात मुले-मुली 10 सेकंद त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर हात ठेवून सांगत आहेत की जे घडले ते योग्य नाही.
दरम्यान, युरोपियन युनियनच्या मूलभूत अधिकार एजन्सी (FRA) च्या अलीकडील डेटावरून असे दिसून आले आहे की, 2016 आणि 2021 दरम्यान छळाचा सामना करणाऱ्या 70% इटालियन महिलांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची तक्रार केली नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)