International Condom Day 2020: सर्वात जास्त हिट ठरुनही 'या' कंडोमच्या जाहिराती झाल्या होत्या बॅन; तुम्ही पाहिल्यात का? (Watch Video)

आंतरराष्ट्रीय कंडोम डे च्या निमित्ताने भारतातील काही कंडोम जाहिरातींची यादी आम्ही तयार केली आहे जी आपणास इंटरनेटवर आढळू शकते, यातील काहींना टीव्ही वर प्रक्षेपणास बंदी घालण्यात आली आहे

Banned Condoms Ads In India (Photo Credits: File Image)

HIV सहित अन्य लैंगिक आजारांपासून (Sexual Disease) संरक्षण व्हावे तसेच नको असणारी गर्भधारणा (Pregnancy) टाळता यावी याकरिता कंडोम हा अत्यंत स्वस्त आणि प्रभावी पर्याय आहे, अगदी सामान्य व्यक्तीला सुद्धा परवडेल अशा स्वरूपात अनेक वर्षांपासून कंडोमची विक्री करण्यात येत होती, मात्र अनेकांमध्ये याबाबत संभ्रम आणि संकोच असल्याने या उपायला हवा तितका प्रतिसाद मिळत नव्हता. कालांतराने अनेक कंडोम कंपन्यांनी आपल्या या उत्पादनाचे वेगवेगळे प्रकार लाँच करून आणि या उत्पादनांच्या जाहिराती अधिक सेक्सी आणि बोल्ड करून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. जर का तुम्हाला माहिती असेल तर आज म्हणजेच 13 फेब्रुवारीला आंतराष्ट्रीय कंडोम दिवस (International Condom Day)  साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कंडोम डे च्या निमित्ताने भारतातील काही कंडोम जाहिरातींची यादी आम्ही तयार केली आहे जी आपणास इंटरनेटवर आढळू शकते, यातील काहींना टीव्ही वर प्रक्षेपणास बंदी घालण्यात आली आहे.

पहा Banned Condom Ads In India

International Condom Day 2020: 'व्हॅलेंटाईन डे' आधी संरक्षणाची आठवण करून देण्यासाठी काही मजेशीर कंडोम Memes आणि Jokes

काही काळापूर्वी भारतात सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कंडोमच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली होती. कंडोमच्या जाहिराती या अश्लील असून त्यातून गैर प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळते ह असे म्हणत 2018 मध्ये हे नियम आणखीन कठोर करण्यात आले होते . मात्र सामान्य जनतेकडून यावर नाराजी व्यक्त केली जाताच माहिती आणि प्रक्षेपण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देत केवळ आक्षेपार्ह्य सीन्स दाखवणाऱ्या जाहिरातींनावर नियम लावण्यात आले आहेत अन्य जाहिरातींना हे लागू होत नाही असा खुलासा करण्यात आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif