Instagram Reels Funny Memes and Jokes: इंस्टाग्रामच्या शॉर्ट व्हिडिओ मेकींग फिचर रिल्सवर मजेशीर मीम्स व्हायरल!
टिकटॉक बॅन झाल्यानंतर त्याला पर्याय म्हणून इंस्टाग्रामने हे फिचर सुरु केले आहे. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी चांगलीच संधी उपलब्ध झाली आहे.
इंस्टाग्रामचे नवे फिचर रिल्स कालच लॉन्च करण्यात आले. टिकटॉक बॅन झाल्यानंतर त्याला पर्याय म्हणून इंस्टाग्रामने हे फिचर सुरु केले आहे. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी चांगलीच संधी उपलब्ध झाली आहे. मात्र अनेकांना हे फिचर फारसे भावलेले दिसत नाही. कारण याची तुलना सातत्याने टिकटॉक बरोबर केली जात असून याबद्दल अनेक मीम्स, जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये #InstagramReels असून त्यावर मजेशीर जोक्स सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. (टिकटॉक बॅननंतर इंस्टाग्रामचे नवे फिचर Reels लवकरच होणार युजर्ससाठी उपलब्ध; जाणून घ्या या फिचरद्वारे कसे बनवाल शॉर्ट व्हिडिओज)
यापूर्वी इंस्ट्राग्रामचे हे नवे फिचर ब्राझील, जर्मनी आणि फ्रान्स या देशांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर काल हे फिचर भारतात लॉन्च करण्यात आले. काही दिवसांपूर्वी भारतात टिकटॉक या चायनीज अॅपवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे व्हिडिओ मेकर्ससाठी हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. पण व्हिडिओ मेकिंगमध्ये फारसा रस नसलेल्या अनेकांनी यावर मीम्स बनवायला सुरुवात केली आहे. पाहुया सोशल मीडियावर व्हायरल होणारे फनी मीम्स...
Funny Memes and Jokes on Instagram Reels:
यापूर्वी अनेक अॅप्सचे नवे फिचर लॉन्च झाले आहेत. पण सगळ्यावरच फनी मीम्स किंवा जोक्स बनले नाहीत. मात्र Twitter Fleets लॉन्च झाल्यावर नेटकऱ्यांकडून त्यावर मीम्सचा वर्षाव झाला. पण हळूहळू आपण ते स्वीकारले. तसंच इंस्टाग्राम रिल्सवर मीम्स व्हायरल होत असले तरी त्याला नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे भविष्यात स्पष्ट होईल.