Ice Cream Truck Gets Swept Out To Sea: आईस्क्रीम ट्रक समुद्रात वाहून गेला (Watch Video)
इंग्लंडमधील कॉर्नवॉल (Cornwall) येथील लोकप्रिय समुद्रकिनारा हार्लिन बे (Harlyn Bay) येथे समुद्राला भरती आली. ज्यामुळे एक आइस्क्रीम व्हॅन (Ice Cream Van) समुद्रात वाहून (Ice Cream Truck Gets Swept Out To Sea) गेली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
इंग्लंडमधील कॉर्नवॉल (Cornwall) येथील लोकप्रिय समुद्रकिनारा हार्लिन बे (Harlyn Bay) येथे समुद्राला भरती आली. ज्यामुळे एक आइस्क्रीम व्हॅन (Ice Cream Van) समुद्रात वाहून (Ice Cream Truck Gets Swept Out To Sea) गेली. स्थानिक प्रसारमाध्यमांचा हवाला देत काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्त दिले. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, पार्क केलेले वाहन लाटांच्या कवेत आले. ज्यामुळे ते किनारा सोडून खोल समूद्रात दूरपर्यंत वाहून गेले. ही घटना 7 जुलै रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता. दरम्यान, वाहन वाहून जाण्यापासून थांबवण्याच्या प्रयत्नात पर्यटकांसह अनेक प्रेक्षक समुद्रात उतरले पण ते अयशस्वी ठरले. यावेळी सुदैवाने व्हॅन मानवरहित असल्याने कोणीही जखमी झाले नाही. तसेच, कोणतीही दुर्घटना घडली नाही. कोस्टगार्डने पुष्टी केली की, घटना घडली तेव्हा चालक सुरक्षित होता आणि वाहनात नव्हता.
आईस्क्रीम व्हॅन पाण्यात
प्रेक्षकांनी घेतलेल्या आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये आईस्क्रीम व्हॅन लाटांमध्ये तरंगताना दिसत आहे. पॅडस्टो कोस्टगार्डने पुष्टी केली की, समुद्राची भरती ओसरल्यानंतर आणि किनाऱ्याला ओहोटी लागल्यावर रात्री 9:45 च्या सुमारास एका रिकव्हरी वाहनाने वाहन पाण्यातून ओढले. पॅडस्टो कोस्टगार्डच्या प्रवक्त्याने सांगितले की, "काल संध्याकाळी 5 वाजण्याच्या आधी एचएम कोस्टगार्डला हार्लिन बे, कॉर्नवॉल येथे भरतीमुळे अडकलेल्या आइस्क्रीम व्हॅनची माहिती देण्यात आली होती. पॅडस्टो कोस्टगार्ड बचाव पथक आणि आरएनएलआय लाईफगार्ड यांना वाहनाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पाठवण्यात आले होते. मालकाने रिकव्हरी वाहनाची व्यवस्था केली. तसेच, रात्री 9:45 वाजता व्हॅन सुरक्षित असल्याचे सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी खात्री केली आणि ती सुरक्षित असल्याचे पाहून कोस्टगार्ड बचाव अधिकारी निघून गेले. दरम्यान, नंतर भरतीवेळी पाणी अधिकच आल्याने हे वाहन पाण्यात ओढले गेले. (हेही वाचा, आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा पुणे येथील कर्मचाऱ्याचा, DNA चाचणीत धक्कादायक खुलासा; डॉक्टरांचा दावा खरा)
प्रत्यक्षदर्शींकडून चित्रपटातील दृश्याशी तुलना
दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचे वर्णन "अत्यंत विचित्र" असे केले आणि जागतिक चित्रपटातील प्रसंगाशी या दृश्याशी त्याची तुलना केली. या घटनेमुळे समुद्रकिना-याच्या सुरक्षिततेबद्दल आणि भविष्यात अशाच घटना टाळण्यासाठी भरती-ओहोटीचे निरीक्षण करण्याचे महत्त्व याबद्दल चर्चा वाढली आहे.
व्हिडिओ
कॉर्नवॉल बीच गाईडने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार,नॉर्थ कॉर्नवॉल किनाऱ्यावरील हार्लिन बे हा समुद्राची भरती-ओहोटीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू असलेला एक उत्कृष्ट समुद्रकिनारा आहे. जो कुटुंब आणि पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. कमी भरतीच्या वेळी किराऱ्यावरची वाळू खाडीच्या पश्चिमेला ओंजॉन कोव्हपर्यंत पसरते. हार्लिन बे हे मदर आयवेस बे आणि ट्रेव्होस हेडच्या पश्चिमेकडे जाणाऱ्या काही उत्कृष्ट किनारपट्टी मार्गासाठी एक चांगले ठिकाण आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)