Himachal Chakki Railway Bridge Collapsed: हिमाचल आणि पंजाबला जोडणारा चक्की रेल्वे पूल कोसळला; Watch Video

खाण माफियांनी पुलाच्या पुढे व मागे अशा दोन्ही बाजूने बेकायदा उत्खनन करून चक्क खड्ड्याचा प्रवाह आवळला.

Himachal Chakki Railway Bridge Collapsed (PC - Twitter)

Himachal Chakki Railway Bridge Collapsed: पंजाबला हिमाचलशी जोडणारा कंडवाल येथील चक्की रेल्वे पूल (Chakki Railway Bridge) वाहून गेला. शनिवारी सकाळी अचानक पुलाचा पिलर व दोन स्पॅम पडले. चक्कीखडच्या पाण्याची पातळी वाढल्याने आजूबाजूचे लोक प्रवाह पाहण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान अचानक पुलाला तडा गेला. पूल तुटल्याने कांगडा व्हॅली रेल्वे संपर्कही पूर्णपणे तुटला आहे. गेल्या महिनाभरापासून रेल्वे विभागाने पठाणकोट ते जोगेंद्रनगर ट्रॅकपर्यंत जाणारे मार्ग पावसामुळे बंद केले होते. कारण, रेल्वे पथकाने हा पूल असुरक्षित घोषित केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा रेल्वे पूल कोसळण्याचे मुख्य कारण अवैध उत्खनन आहे. खाण माफियांनी पुलाच्या पुढे व मागे अशा दोन्ही बाजूने बेकायदा उत्खनन करून चक्क खड्ड्याचा प्रवाह आवळला. पुलाजवळ चक्की नाल्याचा प्रवाह केवळ 12-15 मीटर आहे. त्यामुळेच हा अपघात झाला, असं म्हटलं जात आहे. (हेही वाचा - Rajasthan: राजस्थानमध्ये रस्ते अपघातात 6 भाविक ठार, 20 पेक्षा अधिक जखमी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख)

दरम्यान, कांगडा व्हॅली रेल्वेचा लाभ घेत असलेल्या लोकांना पाऊस थांबल्यानंतर रेल्वे सेवा सुरू होण्याची आणि स्वस्त रेल्वेने प्रवास करता येईल अशी आशा होती. मात्र, आता हा पूल पडल्यामुळे कांगडा व्हॅली रेल्वे पावसानंतरही पूर्ववत होऊ शकणार नाही. येथे दोन-तीन वर्षांपूर्वी रेल्वे पूल कोसळला होता.