उन्हापासून वाचण्यासाठी महिलेने लढवली शक्कल, शेणाने सारवली महागडी कार!
अहमदाबाद: दिवसागणिक देशात वाढत जाणारे तापमान पाहता प्रत्येकजण उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करत असतो.काही मंडळी तर स्वतःसोबत आपल्या पाळीव प्राण्याची, गाड्यांची देखील पुरेपूर काळजी घेत असतात, असाच एक प्रकार गुजरात (Gujrat ) मधील एक महिलेने अलीकडे केला आहे. अहमदाबाद मधील तापमान 45 डिग्रीच्या घरात पोहचले असताना आपल्या गाडीचे उन्हाच्या झळांपासून रक्षण करण्यासाठी गुजरात मधील सेजल शाह (sejal Shah) या महिलेने चक्क गायीचे शेणाने आपली महागडी कार सारवली होती. याबाबत माहिती देणारी एक फेसबुक पोस्ट काही दिवसांपूर्वी रुपेश दास या तरुणाने शेअर केली होती.
या फेसबुक पोस्टमध्ये गाडीला शेण लावणे ही खरोखर अनोखा व हुशार कल्पना आहे, असे म्हंटले आहे. हा फोटो पोस्ट केल्यावर काहीच वेळात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, अशा प्रकारे गाडीला शेण लावल्यावरून काहींनी नाक मुरडली तर काहींनी या कल्पनेचे कौतुक केले आहे. गाडीला शेण फासणं ठीक आहे पण त्यामुळे येणारा दुर्गंध कसा घालवणार असा कुतुहुलपोटी प्रश्न काही नेटकऱ्यांनी सेजल यांना केला होता. नवरदेवाच्या घोड्यावर चढून तरुणाचा जबरदस्त नागिन डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
व्हायरल फेसबुक पोस्ट
या एकूण प्रकाराविषयी सेजल यांच्याशी ANI ने संवाद साधला. ज्यावेळी मी माझ्या घरात जमीनवर शेण सारावते त्यावेळी घरात थंडावा निर्माण होतो यापासूनच प्रेरणा घेऊन मी गाडीला देखील शेण लावण्याचा विचार केला, असे सेजल यांनी सांगितले.
ANI ट्विट
सामान्यतः भारतीय ग्रामीण भागात घराच्या जमिनीवर व भिंतींवर शेण लावण्याची पद्धत आहे, यामुळे उन्हाळयात घरात थंडावा टिकून राहतो तर थंडीत भिंती उष्णता धरून ठेवतात असे मानले जाते. याचप्रमाणे शेण ही नैसर्गिक बहुगुणी गोष्ट आहे असे देखील अनेक आजी आजोबा सांगत असतात, शेणाच्या जिवाच्या जाळल्यास मच्छर व अन्य कीटक दूर राहतात असे समोर आले आहे. मात्र अशा प्रकारे गाडीलाच शेणाने सारवून उन्हापासून रक्षण करता येते असे कुठेही सांगण्यात किंवा ऐकण्यात आलेले नाही