गुजरात: गिरनार मधील शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसले 7 सिंह, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)
केवळ या ठिकाणी आशियातील (Asia) सिंहाचे वास्तव येथे असल्याचे मानले जाते. तर गिरनारच्या जंगलात राहणारे सिंह काही वेळेस लोकवस्तीत घुसल्याचे दिसून येते.
गुजरात (Gujarat) मधील गिरनार जंगल (Girnar Forest) हे राज्यातील जंगालांपेक्षा वेगळे आणि खास आहे. केवळ या ठिकाणी आशियातील (Asia) सिंहाचे वास्तव येथे असल्याचे मानले जाते. तर गिरनारच्या जंगलात राहणारे सिंह काही वेळेस लोकवस्तीत घुसल्याचे दिसून येते. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. गिरनार जवळील एका शहरातील रस्त्यांवर 7 सिंह फिरताना दिसून आले आहेत.
सिंहाचा एक कळप रात्रीच्या वेळेस रस्त्यावर फिरताना दिसून आला आहे. या सिंहाना पाहून परिसरातील कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली. मात्र व्हिडिओत कुत्रे कोठेही दिसून येत नाही आहेत. सिंहाचा मोकळेपणाचा वावर हा जंगलात फिरण्यासारखा होता. असे सांगितले जात आहे की, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे गिर जंगलातील वन्यप्राण्यांना त्याचा फटका बसला आहे.(गवत खाणारा सिंह पाहिला आहे का? पाहा व्हिडिओ)
Tweet:
यापूर्वी सुद्धा जूनागढ़ येथील बिल्खा रोडवर सुद्धा सिंह फिरताना दिसून आला होता. तेव्हाही गिर जंगलामधूनच सिंह लोकवस्तीत आल्याचे दिसून आले होते. मात्र येथील स्थानिक सिंहाच्या समोर बिंधास्त फिरत होते. खरतर गिर जंगलामधील काही सिंह आजूबाजूला असलेल्या लोकवस्तीत फिरताना दिसून येतात.