Google Year in Search 2020: यंदा IPL ठरली गुगलवरील Top Trending Query; जाणून घ्या सरत्या वर्षात सर्वाधिक सर्च झालेल्या Top 10 गोष्टी

डोक्यात कोणतीही शंका असल्यास, कशाचेही उत्तर हवे असल्यास, कोणतीही गोष्ट शोधायची असल्यास बोटे आपोआप गुगलकडे वळतात. या सरत्या वर्षातही अनेक वेगवेगळ्या गोष्टी गुगलवर शोधल्या गेल्या आहेत ज्या गुगल ट्रेंड्स (Google Trends) बनल्या आहेत.

Close up of IPL trophy (Photo Credits : Getty Images)

सध्या सर्च इंजिन गुगल (Google) हे जवळजवळ प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. डोक्यात कोणतीही शंका असल्यास, कशाचेही उत्तर हवे असल्यास, कोणतीही गोष्ट शोधायची असल्यास बोटे आपोआप गुगलकडे वळतात. या सरत्या वर्षातही अनेक वेगवेगळ्या गोष्टी गुगलवर शोधल्या गेल्या आहेत ज्या गुगल ट्रेंड्स (Google Trends) बनल्या आहेत. आता गुगलने यंदा सर्वाधिक शोधलेल्या विषयांची यादी (Google Year in Search 2020) जाहीर केली आहे, यामध्ये इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही सर्वाधिक शोधलेली गोष्ट (Top Trending Query) ठरली आहे.

गुगल इंडियाच्या 'सर्च इन ईयर'चे रिझल्ट्स बुधवारी जाहीर करण्यात आले. यंदा इंटरनेट वापरकर्त्यांनी गुगल सर्चवर जागतिक महामारीपासून ते अमेरिकन निवडणुकांपर्यंतच्या अनेक गोष्टींबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्यपणे पुढील गोष्टी गुगलवर टॉप ट्रेंडिंग क्वेरी ठरल्या आहेत.

या ट्रेंड्सवर नजर टाकल्यावर लक्षात येईल की, भारतीय लोकांना जागतिक महामारीपेक्षा क्रिकेटचा खेळ महत्वाचा वाटत होता. तसेच अमेरिकेची राष्ट्रपती निवडणुकाही भारतीयांच्या उत्सुकतेची गोष्ट ठरली आहे. यामध्ये विजयी ठरलेले जो बिडेन हे नक्की कोण आहेत हे जाणून घेण्याचा भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आहे. (हेही वाचा: आयपीएल, UEFA Champions League, फ्रेंच ओपनसह यंदा भारतात गूगलवर 'या' खेळ स्पर्धांची रंगली चर्चा)

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या ही सर्वांनाच चटका लावून गेली. यंदा सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचरा’ हा लोकांच्या सर्चमध्ये होता. यासह सध्या रिपब्लिक टीव्ही खोट्या टीआरपी प्रकरणात अडकला आहे. माध्यमांमध्ये याबाबत खळबळ उडाली होती. म्हणूनच या वाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामीबद्दल जाणून घेण्यासही भारतीयांना उत्सुकता होती.