'Unworried' चा Google च्या मते मराठी, हिंदी मध्ये अर्थ 'अविवाहित'; Google dictionary मधला गजब प्रकार
गूगलच्या सर्च बॉक्स मध्ये त्याचा “unworried” अर्थ हिंदी मध्ये , मराठी मध्ये असं टाईप करा आणि तुम्हांला काय उत्तर मिळतय बघा.
आजकाल इंटरनेटच्या कृपेमुळे लहान सहान गोष्टींसाठी एका क्लिकवर सहज तुमच्या मनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. इंग्रजी मधून मराठी, हिंदी ते जगभरातील अनेक भाषेत वाक्य भाषांतरीत करण्याची सोय आहे. पण “unworried” हा शब्दाचा अर्थ गूगलच्या डिक्शनरी मध्ये काही भलताच आहे. साधारणपणे “unworried” चा अर्थ “not anxious" किंवा "uneasy” म्हणजेच बेफिकीर, काळजी न करणारा असा होऊ शकतो पण गूगलने भारतीय भाषांमध्ये दाखवलेला त्याचा अर्थ पाहून तुम्हांलाही हसू आवरणार नाही हे खरं. गूगलने चक्क “unworried”चा अर्थ “unmarried”म्हणजे अविवाहित असा दाखवला आहे. तुम्हांला विश्वास बसत नसेल एकदा गूगल वर सर्च करूनही पहा.
गूगलच्या सर्च बॉक्स मध्ये त्याचा “unworried” अर्थ हिंदी मध्ये , मराठी मध्ये असं टाईप करा आणि तुम्हांला काय उत्तर मिळतय बघा. (नक्की वाचा: 'Best Toilet paper in the World' म्हणजे पाकिस्तानचा झेंडा, Google वर सर्च करुन पाहा ).
असं म्हणतात की लग्नाचा लाडू खाल्ला तरी मनस्ताप आणि नाही खाल्ला तरीही. कदाचित गूगलला देखील लग्न झालेल्या लोकांच्या मनातील 'लग्नाच्या बंधनाची' घालमेल समजली असेल त्यांनी हे अजब भाषांतर सांगितलं असेल. काहींच्या मते लग्नाच्या बंधनात अडकणं ही चूक असते कारण तुम्ही त्यामुळे नात्यामध्ये गुंतून पडतात. तुमच्या स्वातंत्र्यावर अनेकदा बंधनं येतात. (नक्की वाचा: Google वर 'Bhikhari' हे सर्च केल्यावर पाकिस्तान पंतप्रधान Imran Khan यांचा फोटो ).
दरम्यान गूगलची ही अशी पहिलीच चूक नाही. यापूर्वी देखील देशा-परदेशातील अनेक मोठ्या राजकारण्यांबद्दल, सेलिब्रिटीजबददल गूगल सर्च मधील रिझल्ट हा धक्कादायक पहायला मिळाला आहे. त्यामध्ये आता या अजून एक गजब भाषांतराची भर पडली असावी.