सर व्ही. आर्थर लुईस यांना 1979 ला आजच्या दिवशी मिळलेल्या Nobel पुरस्काराच्या स्मरणार्थ खास Google Doodle द्वारा सलाम!

1979 साली आजच्याच दिवशी Sir W Arthur Lewis यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. हा पुरस्कार विकसनशील देशांच्या प्रगतीमध्ये इकॉनॉमिक फॉर्सेस या मॉडेलसाठी देण्यात आला आला होता.

Google Doodle on Sir W Arthur Lewis | Photo Credits: Google.com

Google कडून आज अर्थतज्ञ, प्रोफेसर आणि लेखक सर व्ही. आर्थर लुईस (Sir W Arthur Lewis)यांना Doodle च्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे. 1979 साली आजच्याच दिवशी Sir W Arthur Lewis यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. हा पुरस्कार विकसनशील देशांच्या प्रगतीमध्ये इकॉनॉमिक फॉर्सेस या मॉडेलसाठी देण्यात  आला होता. दरम्यान सर लुईस हे आधुनिक अर्थशास्त्राचे संस्थापक मानले जातात.

London School of Economics मध्ये सर व्ही. आर्थर लुईस हे पहिले कृष्णवर्णीय फॅकल्टी होते. British university मध्ये मानाचं पद मिळवणारे तसेच Princeton University मध्ये पूर्ण वेळ प्रोफेसरशिप सांभाळणारे ते पहिले कृष्णवर्णीय होते.

सर व्ही. आर्थर लुईस यांचा जन्म 23 जानेवारी 1915 दिवशी island of St Lucia मधील Caribbean मध्ये झाला होता. त्यांचे दोन्ही पालक शाळेमध्ये शिक्षक होते. ते Antigua मधून स्थलांतरित झाले होते. वयाच्या 14 व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून त्यांनी सिव्हिल सर्व्हिस मध्ये क्लार्क म्हणून काम करण्यास सुरूवात केली. 1932 मध्ये त्यांनी सरकारी शिष्यवृत्ती मिळवत London School of Economics मध्ये पुढील शिक्षण घेण्याचा निश्चय पक्का केला. वयाच्या 33 व्या वर्षी वर्णभेदाचा सामना करत ते प्रोफेसर झाले. यामध्ये देखील त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. Purushottam Laxman Deshpande's 101st Birthday Google Doodle: पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची 101 वी जयंती, जगप्रसीद्ध सर्ज इंजिनवरील गूगल डूडल पाहिलेत का?

सर व्ही. आर्थर लुईस यांनी पुढे संयुक्त राष्ट्रासोबत काम केले. आफ्रिका, आशिया आणि Caribbean च्या सरकारसोबत अनेक कामं केली. Caribbean Development Bank चे ते पहिले अध्यक्ष ठरले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now