चिमुकलीचा पाळीव कुत्र्यासोबत रंगला लपाछुपीचा खेळ; पहा Viral Video
घरातील व्यक्ती, लहान मुलं यांच्याशी त्यांचा विशेष लळा असतो. यापूर्वी पाळीव प्राण्यांचे अनेक अचंबित करणारे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. आता असाच एक व्हिडिओ समोर येत आहे.
Viral Video: कोणताही पाळीव प्राणी हा प्रेमळ असतो. घरातील व्यक्ती, लहान मुलं यांच्याशी त्यांचा विशेष लळा असतो. यापूर्वी पाळीव प्राण्यांचे अनेक अचंबित करणारे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. आता असाच एक व्हिडिओ समोर येत आहे. यात एक पाळीव कुत्रा घरातील लहान मुलीसोबत चक्क लपंडाव खेळत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही या कुत्र्याचे कौतुक वाटेल. Buitengebieden नामक एका युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्विटर हँडलवर फनी आणि पॉझिटीव्ह व्हिडिओज पाहायला मिळतात. कुत्रा लपाछुपी खेळत आहे, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
या व्हिडिओत तु्म्ही पाहू शकाल की, एक लहान मुलगी कुत्र्याला काही सूचना करत आहे. म्हणजे लपाछुपी खेळुया असं सांगत आहे. कुत्रा ते ऐकतो आणि भितींकडे जावून दोन्ही हातांमध्ये आपला चेहरा लपवतो. त्यानंतर मुलगी लपते आणि त्यानंतर कुत्रा तिला शोधण्यासाठी आत जातो.
पहा व्हिडिओ:
सध्या कोविड-19 लॉकडाऊनमध्ये लहान मुलं घरात राहून अक्षरश: कंटाळून गेली आहेत. त्यामुळे मनोरंजनाची विविध माध्यमं आजमावली जात आहेत. अशावेळी घरातील हा पाळीव कुत्रा या मुलीसोबत खेळत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 137 हजार हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. याला आतापर्यंत 8000 हून अधिक लाईक्स आले आहेत. तर हजारहून अधिक रीट्विट्स आणि कमेंट्स यावर आले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
हा व्हिडिओ 25 सेकंदाचा असून यातील कुत्रा बेल्जियम शेफर्ड प्रजातीचा आहे. कुत्र्याचे हे क्युट आणि लाघवी वागणे नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. यावर विविध प्रतिक्रीया उमटत आहेत.