Ganpati Bappa on Bullock Cart: मुंबईच्या रस्त्यावर थेट बैलगाडीतून बाप्पाचे आगमन; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंटचा पाऊस (Watch Video)

मिळेल त्या वाहनाने गणेश मूर्ती घरी आणल्या जातात. मात्र, एक सुखद धक्का देणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

Photo Credit- X

Ganpati Bappa on Bullock Cart: आज गणेश चतूर्थीनिमित्त देशभरात घरोघरी गणरायाचे स्वागत होत आहे. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. गणेश भक्त गणरायाची मुर्ती घरी(Ganpati Welcome) आणण्यासाठी मिळेल ते वाहन पकडून गणेश मूर्तींच्या दुकानात दाखल होत आहेत. तेथीन गणेश मूर्ती घरी आणत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही आधूनिक पद्धत वापरली जात आहे. मात्र, आपली खरी संस्कृती दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरचा हा व्हिडीओ आहे. ज्यात गणरायाची मूर्ती थेट बैलगाडीतून आणली जात(Ganpati on Bullock Cart) आहे. बैलगाडीला विशेष सजावट करण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. (हेही वाचा: Ganeshotsav 2024: मुंबई पोलिसांना वर्दी मध्ये असताना ढोल ताशाच्या तालावर नाचण्यास Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar यांची मनाई; कडक कारवाईचे निर्देश)

starryeyes2054 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, “सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर बैलगाडीवर बाप्पा दिसण्याची शक्यता किती आहे?” त्यावर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, 'सगळ्यात भारी बैलगाडी… जुनं ते सोनं च आहे.. तुमचं हजार कोटी च वाहन असलं तरी आमच्या संस्कृती साठी ही बैलगाडी च छान आहे' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'आपली संस्कृती जपा भारी वाटला हा आगमन सोहळा' तर तिसऱ्या युजरने लिहिले की, 'हे मुंबईतच घडू शकते.'

मुंबईच्या रस्त्यावर बैलगाडीतून बाप्पाचे आगमन

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Udyawar l India (@starryeyes2054)

ठिकठिकाणी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. सार्वजानिक मंडळांकडून बाप्पांची मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केलं जात आहे. सोशल मीडियावर बाप्पााच्या आगमनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आज अनेक कलाकारांपासून, राजकीय नेते, खेळाडूंच्या घरी गणपतीच आगमन होत आहे.