Donald Trump यांचे Twitter अकाऊंट कायमस्वरुपी बंद! सोशल मीडियावर फनी मीम्स आणि जोक्स व्हायरल

यावरुन आता सोशल मीडियावर फनी मीम्स आणि जोक्स तुफान व्हायरल होत आहेत.

Donald Trump's Twitter Account Permanently Banned Memes (Photo Credits: Twitter)

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट (Twitter Account) कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. यावरुन आता सोशल मीडियावर फनी मीम्स आणि जोक्स (Funny Memes & Jokes) तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगमध्ये केलेल्या हिंसाचारी आंदोलनानंतर (Capitol Violence) त्यांच्यावर चहुबाजूंनी जोरदार टीका होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे समर्थक आक्रमक झाल्याने त्यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. यापूर्वी देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते बॅन केले होते.

दरम्यान, ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे ट्विट केले. @RealDaldTrump नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटची तपासणी केल्यानंतर ट्विटरने एक निवेदन सादर केले. त्यात त्यांनी म्हटले की, हिंसाचारास प्रवृत्त होण्याचा धोका असल्याने आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी सस्पेंड करत आहोत. आता यावर नेटकऱ्यांनी फनी मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पहा व्हायरल फनी मीम्स आणि जोक्स:

महत्त्वाचे म्हणजे अकाऊंट कायमस्वरुपी बंद करण्यात आले त्यावेळी ट्रम्प यांचे 8.87 कोटी फॉलोअर्स होते. तर ट्रम्प केवळ 51 लोकांना फॉलो करत होते. अकाऊंट बंदीनंतर ट्रम्प म्हणाले की, "भविष्यात असे काहीतरी होईल याचा मला अंदाज होताच. आम्ही इतर वेगवेगळ्या साईट्स सोबत चर्चा करत आहोत आणि त्याबद्दल लवकरच मोठी घोषणा करण्यात येईल. त्याचबरोबर लवकरच स्वत:चे प्लॅटफॉर्म बनवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मी गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला."



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif