IPL Auction 2025 Live

Friedlieb Ferdinand Runge:जगाला कॅफेन भेट देणारे रसायनशास्त्रज्ञ फ्रेडलिब फर्नेन रंज यांच्यावर खास Google Doodle

त्यांनी अत्यंत कमी वयात बेलाडोना झाडाच्या (Beladonna's plants) पानांवर प्रयोग करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांना ध्यानात आले की, ही पाने खाल्ल्यावर मेंदूला आणि डोळ्यांना तरतरी येते. मग त्यांनी त्यात पुढे अधिक संशोधन केले. ज्यामुळे कॅफेनचा शोध लागला. 73 वर्षांचे आयुष्य जगल्यानंतर फ्रेडलिब यांनी 25 मार्च 1867 मध्ये अखेरचा श्वास घेतला.

Friedlieb Ferdinand Runge Google Doodle | (Photo courtesy: Google)

Friedlieb Ferdinand Runge Google Doodle: इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल (Google) काय डूडल (Doodle) बनवतं किंवा डूडलमध्ये कोण/काय झळकंत याबाबत जगभरात उत्सुकता असते. कारण, जगभरातील विविध घटना, घडामोडी, व्यक्ती त्यांचे कार्य आणि त्या कार्याची इतिहासाने घेतलेली नोंद याची एकप्रकारे उजळणीच डूडलमध्ये केली जाते. यात अनेकदा महान कार्य केलेल्या मंडळींच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहून आदरही व्यक्त केला जातो. आजचे डूडलही असेच काहीसे हटके आहे. जगप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ (Chemist)फ्रेडलिब फर्नेन रंज (Friedlieb Ferdinand Runge) यांना त्यांच्या 225 व्या जयंतीनिमित्त गूगलने डुडलच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.

काय आहे डूडलमध्ये?

आजच्या डूडलमध्ये फ्रेडलिब यांची छबी दिसते. यात फ्रेडलिब हे स्वत: कॉफीचा कप हातात घेतलेलेल पाहायला मिळतात. वरवर पाहताना ते केवळ कॉफी पिताना दिसतात. पण, डूडल काहीसे निरखून पाहिले तर ध्यानात येते की, फ्रेडलिब हे केवळ कॉफीच पित नाहीत तर, ते कॅफेनची अनुभूती घेत असल्याचे भावही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. त्यांच्या बाजूला एक गोंडस मांजरही पाहायला मिळते. 8 फेब्रुवारी 1794 मध्ये जन्मलेल्या फ्रेडलिब यांना रसायणशास्त्रात विशेष रुची होती. ती त्यांच्या बालवयापासूनच होती. यातूनच त्यांनी कॉफीमध्ये आढळणाऱ्या साइकोअॅक्टिव ड्रग कॅफेन (Psychoactive Drug Caffeine) या पदार्थाचा शोध लावला. कॅफेनमध्ये असणारे घटक Psychoactive (मेंदूला प्रभावीत करणाऱ्या घटक) असतो. 1819 मध्ये रेंज फ्रेडलिब यांनी हा घटक शोधून काढला. त्याला कॅफेन असे नाव दिले. कॅफेन हा मूळ जर्मन भाषेतला आहे. तो शब्द Kaffee असा होता पण पुढे कॅफेन असा रुढ झाला. (हेही वाचा, Lev Landau यांची 111 वी जयंती: Google ने Doodle बनवून केला सन्मान)

बालवयापासूनच फ्रेडलिब हे धडपडी आणि जिज्ञासू होते. त्यांनी अत्यंत कमी वयात बेलाडोना झाडाच्या (Beladonna's plants) पानांवर प्रयोग करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांना ध्यानात आले की, ही पाने खाल्ल्यावर मेंदूला आणि डोळ्यांना तरतरी येते. मग त्यांनी त्यात पुढे अधिक संशोधन केले. ज्यामुळे कॅफेनचा शोध लागला. 73 वर्षांचे आयुष्य जगल्यानंतर फ्रेडलिब यांनी 25 मार्च 1867 मध्ये अखेरचा श्वास घेतला.