Leopard Attacked On Guy Whittall: झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय व्हिटल याच्यावर बिबट्याचा हल्ला; थोडक्यात बचावला, रुग्णालयात दाखल

या वेळीही तो जीवघेण्या हल्ल्याला सामोरा गेला आणि पुन्हा एकदा त्याने मृत्यूला चकवा दिला. गाय विटल (वय 51 वर्षे) याच्यावर बीबट्याने हल्ला केला आहे. धक्कादायक म्हणजे अलिकडेच त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला होता.

Guy Whittall | (Photo Credit - Facebook)

Guy Whittall Injured In Leopard Attack: झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय व्हिटल पुन्हा एखदा गंभीर जखमी झाला आहे. या वेळीही तो जीवघेण्या हल्ल्याला सामोरा गेला आणि पुन्हा एकदा त्याने मृत्यूला चकवा दिला. गाय विटल (वय 51 वर्षे) याच्यावर बीबट्याने हल्ला केला आहे. धक्कादायक म्हणजे अलिकडेच त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता पण सुदैवाने बचावला होता. ही घटना घडल्याला काहीच दिवस उलटत नाहीत तोवर पुन्हा एकदा त्याच्यावर वन्य प्राण्याने हल्ला केला आहे. झिम्बाब्वेच्या हुमनी प्रदेशात ट्रेकिंग करताना त्याला बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्याचा सामना करावा लागला.

कुत्र्याच्या भुंकण्यामुळे वाचले प्राण

गाय व्हिटल याची पत्नी हन्ना स्टूक्स-व्हिटल यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. ज्यात व्हिटलला त्याच्या डोक्याभोवती पट्टी बांधून वैद्यकीय उपचार मिळत असल्याचे चित्र आहे. हल्ल्यानंतर, त्याला हरारे येथील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्या जखमांवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेचे वर्णन करताना, स्टोक्स-व्हिटल यांनी त्यांच्या कुत्र्याच्या शौर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आपला पती बिबट्याचा हल्ला होऊनही बचावला असेही त्याने म्हटले. (हेही वाचा, Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू, जुन्नर येथील विचलित करणारी घटना)

बिछान्याखाली एक भलीमोठी मगर

गाय व्हिटल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. गाय व्हिटल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ती कारणेही अतिशय हटके असतात. सप्टेंबर 2013 मध्ये त्याच्या बिछान्याखाली एक भलीमोठी मगर आढळून आली होती. विशेष म्हणजे ही मगर रात्रभर त्याच्या बेडखालीच पडून होती. (हेही वाचा, Leopard Attack in Nashik Video: नाशिक येथे आडगाव शिवारात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, पाहा व्हिडिओ)

सोशल मीडिया पोस्ट

गाय व्हिटल हा त्याच्या कालातील एक आक्रमक आणि अष्टपैलू क्रिकेटपटू होता होता. तो उत्कृष्ठ फलंदाज होताच. पण तो गोलंदाजही तितक्याच ताकदीचा होता. खास करुन त्याचे थ्रो विशेष कौतुकास्पद असत. वयाच्या 16 व्या वर्षी त्याची राष्ट्रीय शाळेच्या संघासाठी निवड झाली आणि त्याने हरारे सेंट्रल संघाविरुद्ध झिम्बाब्वे स्कूल्ससाठी लोगान कपमध्ये (त्याच्या प्री-फर्स्ट-क्लास दिवसांमध्ये) शतक झळकावले. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर लगेचच पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. 1995 मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेच्या पहिल्या कसोटी विजयात आणि 1998-99 मध्ये त्यांच्याविरुद्ध कसोटी द्विशतक पूर्ण करताना त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्याने दमदार कामगिरी केली. सप्टेंबर 2000 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 188 धावा आणि झिम्बाब्वेच्या 1999 च्या यशस्वी विश्वचषक संघात महत्त्वाची भूमिका त्याने बजावली. तीन विश्वचषकांसह 46 कसोटी आणि 147 एकदिवसीय सामने खेळल्यानंतर, त्याने मार्च 2003 मध्ये आपल्या कुटुंबाच्या खेळाच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्तीची घोषणा केली.