Foreigner Women Uses Vimal Bag: गुच्ची, प्रादा सोडून विमल बॅग घेऊन रस्त्यावर फिरताना दिसल्या परदेशी महिला (Watch Video)

विमलचा चाहता वर्ग केवळ भारतातच नाही तर परदेशातही पोहोचला आहे. हो! आता परदेशी लोकांमध्येही विमलची क्रेझ पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन परदेशी महिला विमलची बॅग घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

Foreigner Women uses Vimal Bag (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Foreigner Women Uses Vimal Bag: भारतात विमल (Vimal)ची खूपच क्रेझ आहे. सोशल मीडियावरही विमलची क्रेझ दररोज दिसून येते. कोणी विमल मिसळून चहा बनवतो, तर कोणी सरबत. विमलचा चाहता वर्ग केवळ भारतातच नाही तर परदेशातही पोहोचला आहे. हो! आता परदेशी लोकांमध्येही विमलची क्रेझ पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन परदेशी महिला विमलची बॅग घेऊन रस्त्यावर (Foreigner Women Uses Vimal Bag) फिरताना दिसत आहेत.

हँडबॅग्ज म्हणून लोक गुच्ची, प्रादा, लुई व्हिटॉन सारख्या ब्रँड्सकडे आकर्षित होत असताना, या परदेशी महिला विमलच्या देसी बॅगला फॅन बनल्या आहेत. विमलच्या देसी बॅगने आता हाय-फाय ब्रँड्सनाही मोठा झटका दिला आहे. या परदेशी तरुणींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पदेशी महिलांच्या हातात विमलची पिशवी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तथापी, या व्हिडिओवर लोक प्रचंड कमेंन्ट्स करत असून व्हिडिओला लाईक करत आहेत. या परदेशी मुलींनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडल @namasterosy आणि jamocu वरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो कोट्यावधी लोकांनी पाहिला आहे आणि लाखो लोकांनी तो लाईक केला आहे. (हेही वाचा - Prada च्या रॅम्प वर 'कोल्हापुरी चपला' पुन्हा भारताचा उल्लेख टाळल्याने भडकले नेटकरी)

परदेशी महिलांनी वापरली विमल बॅग, पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rosalba Pérez (@namasterosy)

या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, परदेशी महिला विमलची पिशवी हँडबॅगसारखी लटकवून अभिमानाने चालत आहेत. त्यांचे हावभाव असे आहेत, जसे की, त्या जगातील सर्वात महागडी बॅग घेऊन जात आहेत. दोन्ही मुली ही बॅग टोट बॅगसारखी धरून रस्त्यावर कॅटवॉक करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहून असे वाटते की जणू काही त्यांनी पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्पवर वॉक करत आहेत. हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'नो गुच्ची, नो प्रादा, नो एलव्ही, ओन्ली विमल.'

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement