Peacock Breathing Fire: मोराचा तोंडातून निघाल्या ज्वाला, व्हिडिओ पाहून नेटीझन्स अवाक; Watch Viral Video
हा व्हिडिओ खूपच अप्रतिम असून तो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. इन्स्टाग्रामवर इनसाइडहिस्ट्री नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला 24 लाख लाईक्स आणि 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
Peacock Breathing Fire: आजपर्यंत आपण फक्त अजगरालाचं तोंडातून अग्निश्वास घेताना पाहिले किंवा ऐकले असेल. पण सध्या सोशल मीडियावर एका मोराचा व्हिडिओ व्हायरल (Peacock Viral Video) होत आहे. ज्यामध्ये तो आग ओकताना दिसत आहे. मोर पुन्हा पुन्हा तोंड उघडून आवाज काढत आहे. यावेळी त्याच्या तोंडातून आग निघताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मोराच्या तोंडातून आग कशी निघते. खरं तर, हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला समजेल की ही आग नसून मोराच्या मागून येणारा सूर्यप्रकाश आहे. मोराच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या वाफेवर सूर्यप्रकाश पडल्याने त्याचा रंग सोनेरी झाला. मोराच्या तोंडातून ज्वाळा निघत असल्यासारखे दिसते. जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला तेव्हा मोराच्या तोंडातून आग निघत असल्याचे दृश्य दिसत आहे. (हेही वाचा -Viral Video: नळाच्या पाण्याखाली शिळी नान धुवून बनवली हॉटेलसारखी गरमागरम आणि ताजी, व्हिडीओ व्हायरल)
हा व्हिडिओ खूपच अप्रतिम असून तो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. इन्स्टाग्रामवर इनसाइडहिस्ट्री नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला 24 लाख लाईक्स आणि 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Beware! Suspicious Strawberries in Market: पुण्यातील बाजारात दिसल्या लाल रंगाचे पाणी लावलेल्या स्ट्रॉबेरीज; FDA ने सुरु केली जनजागृती मोहीम (Watch Video))
पहा व्हिडिओ -
व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियाही अप्रतिम आहेत. मोरासारखा सुंदर पक्षी या पृथ्वीतलावर नाही असे अनेकांनी सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर तोंडातून आग काढणाऱ्या या मोराचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)