Fact Check: 'मन की बात' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन 5.0 ची घोषणा करणार? या व्हायरल होणाऱ्या बातमीचे गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण, जाणून घ्या सत्य

या मागील सत्य गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. जाणून घ्या...

Lockdown 5.0 Details (Photo Credits: File Photo)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून अनेक अफवा, चुकीची माहिती, फेक न्यूज वेगाने पसरु लागल्या. सोशल मीडियावर तर फेक न्यूजचे पेव फुटले. आता लॉकडाऊनबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. येत्या 31 मे रोजी होणाऱ्या 'मन की बात' (Maan Ki Baat) या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लॉकडाऊन 5.0 (Lockdown 5.0) ची घोषणा करणार, अशी बातमी सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा हा कोरोना व्हायरसची संख्या सर्वाधिक असलेल्या शहरांमध्ये जाहीर केला जाईल, असे या बातमीत म्हटले आहे. तसंच 70 टक्के कोरोना बाधित असलेल्या 11 शहरांमध्ये लॉकडाऊन 5.0 घोषित केला जाईल. यात मुंबई, दिल्ली, बंगळुरु, पुणे, ठाणे, इंदोर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता या शहरांचा समावेश असणार आहे. तसंच लॉकडाऊनच्या या टप्प्यात अनेक सोयी-सुविधांसाठी सवलत दिली जाईल, असेही या बातमीत म्हटले आहे. विशेष म्हणजे ही माहिती गृहमंत्रालयाने दिली असल्याचेही त्यात सांगण्यात आले आहे.  परंतु, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे गृहमंत्रालयाच्या प्रवक्तांनी स्पष्ट केले आहे.

यामागील सतत्या सांगण्यासाठी गृहमंत्रालयाच्या प्रवक्तांनी ट्विट केले आहे. बातमीतील सर्व दावे हे पत्रकाराचे अनुमान आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या आधारे ही बातमी देणे हे अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदारपणाचे आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Fact Check: देशातील सर्व राज्यात शाळा-कॉलेज सुरु करण्यास गृहमंत्रालयाची परवानगी? जाणून घ्या)

Fact Check By Ministry of Home Affairs:

कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन यामुळे आधीपासूनच देशातील नागरिक अस्वस्थ आहेत. अनेक प्रश्न नागरिकांसमोर उभे आहेत. त्यात अशा चुकीच्या माहितीमुळे नागरिकांचा अधिच गोंधळ उडतो. त्यामुळे माहितीची सत्यता तपासल्याशिवाय कोणताही मेसेज, बातमी फॉरवर्ड करणे चुकीचे आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन या संबंधित लेटेस्ट अपडेट्स आणि खरी माहिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्रालयाच्या वेबसाईटला किंवा 'लेटेस्ली'ला भेट द्या.